55 Annual Report

Published on

कामायनी प्रशिक्षण संशोधन सोसायटी पुणे

स्थापना: २१ डिसेंबर १९६४

५५ वा वार्षिक अहवाल: २०१९-२०

२७०/बी गोखलेनगर, पुणे ४११०१६

दूरध्वनी: ०२० – २५६५१५८८, ०२० – २५६७३५२९

संकेतस्थळ: www.kamayani.org

ईमेल: kamayani.society@gmail.com

अनुक्रमणिका 

वार्षिक सभेची सूचना 

संस्थेचे वार्षिक वृत्त 

सांख्यिकी 

व्यवस्थापन 

लेखापत्रके: 

आयव्यय व ताळेबंद

लेखा परीक्षण अहवाल 

कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी

२७०/बी गोखलेनगर, पुणे ४११०२१

                                                                                              दिनांक – १ डिसेंबर २०२०

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

महोदय /महोदया 

कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.    डिसेंबर २०२० रोजी वाजता “कामायनी” गोखलेनगर, पुणे येथे होणार असून कामकाजाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. 

१. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे 

२. सन २०१९-२० चा अहवाल मंजूर करणे 

३. सन २०१९-२० चा आयव्यय व ताळेबंद मंजूर करणे 

४. सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक मंजूर करणे 

५. मा अध्यक्षांच्या अनुमतीने येणारे आयत्या वेळचे विषय 

तरी आपण सभेस उपस्थित राहण्याचे करून संस्थेवरील स्नेह कायम ठेवावा ही नम्र विनंती. 

आपला विश्वासू 

अड. सुहास वसंत नगरे 

कार्यवाह 

संस्थेचे वार्षिक वृत्त 

.  उपक्रम 

   संस्थेच्या तीन केंद्रात खालीलप्रमाणे उपक्रम सुरु होते. 

  • गोखलेनगर, पुणे ४११०१६
  • कामायनी विद्या मंदिर, शाळा
  • कामायनी उद्योग केंद्र, कार्यशाळा
  • बालबोधिनी, प्रारंभिक आंतरक्षेपण केंद्र
  • संशोधन विभाग
  • प म जोशी ग्रंथालय
  • सांस्कृतिक सभागृह
  • निगडी, पिंपरी चिंचवड ४११०४४
  • कामायनी विद्या मंदिर, शाळा 
  • कामायनी उद्योग केंद्र, कार्यशाळा 
  • बाल मार्गदर्शन केंद्र
  • हरितगृह
  • सांस्कृतिक सभागृह
  • तळेगाव दाभाडे, ता मावळ, जि पुणे 
  • सिंधुताई जोशी उद्योग केंद्र 

वार्षिक वृत्त

. घटक संस्था 

  • गोखलेनगर: शाळा (प्रमुख: श्रीमती सुजाता आंबे) व कार्यशाळा (प्रमुख: श्री कालिदास सुपाते) 
1दरवर्षीप्रमाणे सर्व सण, राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी विद्यार्थ्यांना माहिती देऊन साजरे करण्यात आले.
2 २० जुलै २०१९ रोजी पं केशव गिंडे यांच्या बासरी वादनाचा कार्यक्रम ‘अनाम प्रेम’ या संस्थेतर्फे मुनोत हॉल मध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी सादर करण्यात आला.
3२१ सप्टेंबर २०१९ रोजी बी एन वाय मेलन कंपनीच्या ८१ स्वयंसेवकांनी आपल्या विद्यार्थ्यांसमवेत मौजेचे खेळ घेतले. त्यांच्या “सामाजिक जबाबदारी’ उपक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला.
4१८ऑक्टोबर २०१९ रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे दिवाळी प्रदर्शन व आनंद मेळावा यांचे आयोजन करण्यात आले होते. 
5अपंग सप्ताहात श्री बालाजी मंदिर, केतकावळे येथे ४ डिसेंबर २०१९ रोजी विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली होती. एकूण ९४ विद्यार्थी व २५ कर्मचाऱ्यांनी सहलीचा आनंद घेतला. 
6६ डिसेंबर २०१९ ला मैदानावर बालजत्रा भरवण्यात आली होती. त्यामध्ये वेगवेगळे खेळ व घोडागाडी, मिकी माउस असे करमणुकीचे प्रकार होते. सर्व मुलांनी उत्साहाने त्यात भाग घेतला.  संगीत शिक्षिका श्रीमती अदिती सावंत यांनी हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.
7नृत्य, गायन, चित्रकला आणि क्रीडा स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी भाग घेऊन पारितोषिकेही मिळवीत असतात. यंदाही उल्लेखनीय यशाची मालिका कायम राहिली. त्यातील काही खालीलप्रमाणे:
 बालकल्याण डूडल काढणे – प्रथम क्रमांक
 जीवनज्योत नृत्य – लहान गट प्रथम क्रमांक
 लायन्स गायन – दुसरा क्रमांक
 लायन्स नृत्य – दुसरा क्रमांक
 बालकल्याण कोडे सोडविणे – दुसरा क्रमांक 
8विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी खालीलप्रमाणे करण्यात आली. 
 २ ऑगस्ट २०१९: भारती  विद्यापीठ वाचा व श्रवणविज्ञान विभागातर्फे ११२ विद्यार्थ्यांची वाचा क्षमता तपासणी करण्यात आली. त्यातील २३ विद्यार्थ्यांना आठवड्यातून २ दिवस भारती विद्यापीठात वाचा उपचार दिले जातात. 
 २० सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हा रुग्णालय औंध यांच्यातर्फे ११२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 
 १२ ऑक्टोबर २०१९ रोजी कम्युनिटी आय केअर प्रतिष्ठान तर्फे ५२ विद्यार्थ्यांचे डोळे तपासण्यात आले आणि १९ विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले. 
9खालील शिक्षकांनी विशेष प्रशिक्षण वर्गांचा लाभ घेतला:
 नैसर्गिक व कृत्रिम पुष्परचना: श्रीमती शुभांगी शहा व श्री आबा भालेराव 
 जय वकील शाळा प्रस्तुत आणि शासन पुरस्कृत बुद्धिबाधित दिव्यांगांसाठी नवीन अभ्यासक्रम तयार करणे: श्रीमती सुजाता आंबे व श्रीमती शुभांगी शहा 
10यंदा ३३ व्या वर्षी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २१-२३ जानेवारी २०२० दरम्यान करण्यात आले आणि १८ वर्षाखालील व त्यावरील अशा दोन गटांत स्पर्धा घेण्यात आली. लहान गटात ४ संघात ६० विद्यार्थी व मोठ्या गटात ९ संघातल्या १३५ विद्यार्थी खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद घेतला. 
  • निगडी: शाळा (प्रमुख: श्रीमती सुनंदा जोशी) व

      कार्यशाळा (मानद प्रमुख: श्री भाऊसाहेब कांबळे)

1दरवर्षीप्रमाणे सर्व सण, राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी विद्यार्थ्यांना माहिती देऊन साजरे करण्यात आले.
2बाल मार्गदर्शन केंद्रात १५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. अपंग मार्गदर्शन केंद्रात ५० ते ६० पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. 
3अपंग सप्ताहानिमित्त आंतरशालेय स्पर्धा कोलाज व फुले बनविणे या कलाप्रकारात घेण्यात आली. श्रीमती मेघा गर्ग यांनी मुलांसाठी खेळणी उपलब्ध करुन दिली. पालकांसाठी श्री.अशोक देशमुख यांचे तणाव व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान  झाले. विश्व श्रीराम संस्थेतर्फे मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
4२२ ऑक्टोबर २०१९ रोजी ४२२शाळेत दिवाळी प्रदर्शन भरविण्यात आले.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री झाली.पालकांचा प्रतिसाद उत्तम मिळाला.
5१७ जानेवारी २०२० रोजी १७रामकृष्ण मोरे सभागृह,चिंचवड येथे शाळा,कार्यशाळा व तळेगाव कार्यशाळेचे वार्षिक स्नेह संमेलन झाले. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिनेकलावंत श्री. राहुल सोलापूरकर उपस्थित होते.
6११ फेब्रुवारी २०२० रोजी तथापी संस्थेतर्फे पालकांसाठी श्री.अच्युत बोरगावकर यांचे वाढत्या वयाच्या मुलांच्या लैंगिक समस्या या विषयावर व्याख्यान झाले.
7२८ फेब्रुवारी २०२० रोजी शाळा व कार्यशाळेची शैक्षणिक सहल खेडगाव वाखारी,दरेकर वाडा,पुणे येथे नेण्यात आली होती. सहलीचा उद्देश मुलांना ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष रूप पाहता यावे हा होता. 
8नवीन उपक्रम:-यंदा प्रथमच संस्थेने दि.03/03/2020 रोजी मुलींच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात १४ शाळा व २८ मुलींनी भाग घेतला होता.
9निगडी शाळेतील पहिल्या मजल्यावर पूर्वी मंजूर केलेल्या आराखड्यानुसार सभागृहाचे बांधकाम सुरु करण्यात आले. हे सभागृह तयार झाल्यावर पूर्वीच्या सभाकक्षाचे तीन वर्ग करण्यात येतील व त्यायोगे शाळेच्या प्रतीक्षा यादीवर असलेल्या ४०अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. 
  • तळेगाव कार्यशाळा (प्रमुख: श्री दिलीप भोसले)
1१2 मे २०१९ रोजी केंद्राचा तिसरा  वर्धापनदिन श्रीमती रोहिणी मोरे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पुणे जिल्हा परिषद व श्री निशिकांत डांगे, के के नाग लिमिटेड, उर्से  यांच्या  सन्माननीय  उपस्थितीत संपन्न झाला.
220 जून २०१९रोजी जागतिक योगदिन साजरा करण्यात आला, श्रीमती ज्योती प्रकाश मुंगी अरुण मा.पालकृत यांनी योगासनाचे शरीर बलवान व मन प्रसन्न ठेवण्यासाठीचे महत्व विषद केले, सदर प्रसंगी आपल्या प्रशिक्षणार्थीनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली.
315 ऑगस्ट 2019 रोजी लायन श्री निलेश मेहता, माजी अध्यक्ष लायन्स क्लब तळेगाव दाभाडे, यांच्या शुभहस्ते, मा. डॉ. आशुतोष भूपटकर, यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला, सदर प्रसंगी मुलांनी देशभक्तीपर गीते गायली.
422 ऑक्टोबर २०१९ दिवाळी निमित्त डॉ अभय पवार, प्राचार्य, इंजिनिअरिंग कॉलेज, डी. वाय. पाटील, आंबी, स्टाफ तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यानी  आपल्या प्रशिक्षणार्थीना दिवाळी  सप्रेमभेट दिली. 
5दिवाळी निमित्त मुलांनी तयार केलेल्या मातीच्या पणत्या, पायपुसणी, तुळशीची रोपे इ. ची विक्री रोटरी क्लब कोथरूड, 9 अंबर हॉल कर्वे रोड, इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे, नाना नानी पार्क, तळेगाव दाभाडे, तसेच कामायनी उद्योग केंद्र गोखले नगर येथे प्रदर्शनात विक्री करण्यात आली.
69 नोव्हेबर रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, सहकार नगर, पुणे येथील अध्यक्ष  श्री. आशुतोष कुलकर्णी, सचिव दीपक भडकमकर व त्यांच्या 34 ज्येष्ठ नागरिकांनी सदिच्छा भेट दिली. कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन क्रिकेट स्पर्धे साठी रु 10000/-रोख देणगी प्रदान केली. 
7समावेशक सिक्ससाईड क्रिकेट स्पर्धा राष्टीय अपंग सप्ताह व जागतिक अपंग दिना निमित्त तळेगाव व पिंपरी चिंचवड परिसरातील विशेष व सामान्य मुलांच्या समावेशक हाफपीच प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या स्पर्धेत, 2 सर्वसाधारण मुले, 4 विशेष मुले आणि राखीव 2 मुले अशा 8 संघा मधून 64 मुलांनी सहभाग करण्यात आला होता. सदर स्पर्धेचा शुभारंभ, रोटरी क्लब तळेगाव सिटी अध्यक्ष, मनोज ढमाले, कार्यकारी विश्वस्त श्रीमती श्रीलेखाताई कुलकर्णी व पारितोषिक वितरण मा.श्री यशवंत भुजबळ, माजी चेअरमन, PDCA यांच्या शुभहस्ते सम्पन्न झाला, प्रथम क्रमांक कामायनी विद्या मंदिर निगडी, द्वितीय पारितोषिक कामायनी उद्योग केंद्र, निगडी, आणि त शिस्तबद्ध संघ पारितोषिक साईसंस्कार संस्था. संभाजी नगर, चिंचवड यांना देण्यात आला, 
8तथापी ट्रस्टपुणे च्या समन्वयिका  श्रीमती सुषमा खराडे यांनी दि 19 डिसेंबर रोजी    पालकांना “शरीर साक्षरता लैंगिकता शिक्षण या विषयी मार्गदर्शन केले, 10 पालकांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला.
9तथापी ट्रस्ट पुणे “आम्ही पण मोठे होतोय ” या मतिमंद मुलांसाठी शरीर साक्षरता व लैंगिकता शिक्षण चित्रसंचाद्वारे माहिती महिला प्रशिक्षणार्थीना श्रीमती सुषमा खराडे व पुरुष प्रशिक्षणार्थीना श्री अच्युत बोरगावकर यांनी मार्गदर्शन केले.
  • बाल बोधिनी प्रारंभिक कृतिक्षेपण केंद्रगोखलेनगर (समन्वयक : डॉ आशा देशपांडे)
1० ते ६ वर्षे वयाच्या बालकांची तज्ञांतर्फे तपासणी, कायिक व वाचिक उपचार तसेच पालकांसाठी समुपदेशन या सर्वांची सोय या केंद्रामध्ये करण्यात आली आहे. 
2आजमितीस एकूण ४३ बालके या केंद्राचा लाभ घेत आहेत. त्यांना नाममात्र शुल्क आकारले जाते. 
3जंगली महाराज रस्त्यावरील कामायनी टॉवर मधून हे केंद्र गोखलेनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. 
  • संशोधन विभाग, गोखलेनगर  (प्रमुख: डॉ आशा देशपांडे )
1यंदा “मासिक पाळीतील मुलींचे आरोग्य – समस्या व व्यवस्थापन” या विषयावर सर्वेक्षणाच्या कामास सुरवात झाली. पुणे परिसरातील संस्थांच्या  साह्याने पालकांना व शिक्षकांना भेटून माहिती गोळा करण्याचे काम हे पालकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. या प्रकल्पाला विमलाबाई जटार ट्रस्ट तर्फे आर्थिक साहाय्य मिळाले आहे.  
2संस्थेला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्यामार्फत संशोधन संस्था म्हणून २०२०-२१ या वर्षासाठी मान्यता मिळाली आहे.   
  • जोशी ग्रंथालय, गोखलेनगर  (व्यवस्था: श्री चंद्रकांत कटकम ) 
1ग्रंथालयातील ग्रंथ संग्रह ५००० च्या वर असून ते सर्व नागरिकांसाठी नाममात्र   शुल्कावर उपलब्ध आहे. 
2ग्रंथालयाची सभासद संख्या २५० पेक्षा अधिक आहे परंतु नव्या तंत्रज्ञानामुळे पुस्तक आंतरजालावर उपलब्ध असल्याने ग्रंथालयाचा वापर कमी होत आहे. 
  • हरितगृह, निगडी 
1हे हरितगृह २०१८ मध्ये निगडी शाळेतील सिंधुताई जोशी हॉल च्या पूर्व बाजूस उभारले असून त्याचे क्षेत्र सुमारे २४०० चौरस फूट आहे.  त्याच्या उभारणीचे सर्व काम व खर्च लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड तर्फे करण्यात आला आहे. 
2या हरितगृहात निरनिराळ्या ऋतू प्रमाणे भाज्यांची लागवड केली जाते व लावणी, फवारणी, तोडणी इ सर्व कामाचा अनुभव  शाळा व कार्यशाळा यामधील मुलामुलींना मिळत असतो. आतापर्यंत भेंडी, मिरची, सिमला मिरची इ भाज्या लावण्यात आल्या आहेत. 

विशेष उल्लेख

यावर्षी प्रथमच साधारण विद्यार्थी व तरुण यांना आपल्या विशेष विद्यार्थ्यांबरोबर सहभाग घेण्याची संधी २१ डिसेंबर २०१९ च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून एक समावेशक प्रभात फेरी गोखलेनगर ते पी वाय सी मैदान अशी काढण्यात आली. विविध संस्थांमधील विशेष मुले व मुली यांनी साधारण विद्यार्थी आणि तरुण यांच्याबरोबर चालत ही फेरी पूर्ण केली. ५००हून अधिक जणांनी या फेरीत भाग घेतला. गुरुकुल, अशोकनगर, सिम्बियोसिस मानसशास्त्र विभाग तसेच बी एन वाय मेलन कंपनीतील कर्मचारी यांनी या उपक्रमात भाग घेऊन विशेष मुलांच्या समाजातील समावेशाचे सक्रिय उदाहरण या निमित्ताने घालून दिले.  

प्रदीप मोघे
कोषाध्यक्ष
सुहास नगरे
कार्यवाह
श्रीलेखा कुलकर्णी
उपाध्यक्ष
आशुतोष  भुपटकर
अध्यक्ष

सांख्यिकी

विद्यार्थी संख्या

केंद्रवर्षारंभनवीन प्रवेशसोडून गेलेवर्षअखेर
शाळा, गोखलेनगर 1251919125
कार्यशाळा, गोखलेनगर 10303100
प्रौढ गट, गोखलेनगर 420339
शाळा, निगडी1001111100
कार्यशाळा, निगडी491160
कार्यशाळा, तळेगाव257131

 कर्मचारी संख्या [मंजूर] नियुक्त 

केंद्रव्यवस्थापन शैक्षणिककार्यालयीनसेवक वर्ग
शाळा, गोखलेनगर [18] 16[2] 2[11] 11
कार्यशाळा, गोखलेनगर [7] 6[2] 2[5] 4
शाळा, निगडी [16] 14[2] 2[6] 6
कार्यशाळा, निगडी सर्व मानद451
कार्यशाळा, तळेगाव सर्व मानद 211

आभार

१. खालील वैद्यकतज्ज्ञांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा मानद रूपात दिली त्याबद्दल त्यांचे संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार 

गोखलेनगर

डॉ जयदीप पाटीलमानसोपचार तज्ज्ञ 
डॉ ऋता सावरकरबालरोगतज्ज्ञ 
डॉ मनीषा गारेकायिक उपचार तज्ज्ञ 
डॉ मधुरा कुलकर्णीवाचिक उपचार तज्ज्ञ 
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयवाचिक उपचार विभाग 

निगडी

डॉ प्रिया गायकवाडमानसोपचार तज्ज्ञ 
डॉ रणजितसिंह मानेवैद्यक तज्ज्ञ 

२. खालील पालक प्रतिनिधींनी स्थानिक व्यवस्थापन समित्यांवर प्रतिनिधित्व केले. 

गोखलेनगर

शाळाश्रीमती सोनाली पाटील 
कार्यशाळाश्रीमती नीलिमा शेळके 

निगडी

शाळाश्री अरुणाचलम दास 
कार्यशाळाश्रीमती वैशाली धादमे 

व्यवस्थापन

विश्वस्त मंडळ

श्रीलेखा कुलकर्णी कार्यकारी
विश्वस्त
डॉ अरविंद कुलकर्णी
विश्वस्त
डॉ आशुतोष भुपटकर
विश्वस्त
डॉ अरविंद कुलकर्णी 
संस्था अध्यक्ष

       कार्यकारिणी:

(१ एप्रिल २०१८ – ३१ मार्च २०२१)

अध्यक्षडॉ आशुतोष भुपटकर
उपाध्यक्षश्रीलेखा कुलकर्णी 
कार्यवाहऍ़ड सुहास नगरे
खजिनदारप्रदीप मोघे 
सहकार्यवाहअशोक कुलकर्णी
सदस्यउत्तरा पंडित
सदस्यसुप्रभा सावंत
सदस्यडॉ जान्हवी थत्ते     
सदस्यमधुलिका भुपटकर
सदस्यडॉ आशा देशपांडे 
सदस्यशरद पटवर्धन
सदस्यजावेद इनामदार 

MY WEEK AT KAMAYANI

Published on

by Janhavi Gowaikar, US

Walking into Kamayani, I had no idea what to expect. My experience with special
populations was limited to the 25 kids in my school that I had already spent a year with
and knew well personally, and those were people I could converse with in my first
language, English. When it came to a school dedicated to special education, and run in a
language I couldn’t fluently speak, I was completely out of my depth. But the thing that
has stood out to me the most during this experience is how accommodating the staff
and the people around me were. Everybody was encouraging, patient with my broken
Marathi, and willing to explain anything I had questions about. It made the whole thing
much smoother and I’m grateful to the people who helped me.
After spending several days in the school, I’ve realized the lack of awareness
most people have of special populations, and how there is so much more I could be
doing, and hope to do, regarding them. I have grown an understanding of how life looks
different for us and for them, and how important the teachers and staff actually are. The
teachers I observed were attentive and used different strategies to help their students
learn. They would break activities down for students that needed more help, and
encourage students who were doing well. I also found it note-worthy how students are
taught personal care and hygiene skills. It’s the kind of thing I never would think about,
but it makes such a huge impact on the students’ lives. Overall, students are taught
valuable things that make it possible for them to function in society.
As expected, there are differences between how things work at Kamayani, and
how things work at my school in America. Most of it has to do with the affluence of my
community, and the involvement of the kids’ families. People in America have easy
access to communication aids such as iPads. Also, they grow up in inclusion programs,
in which special and general populations go to school together, and are more
accustomed to each other. Our schools don’t have vocational workshops like the one at
Kamayani, which makes me wonder what happens to the kids once they graduate high
school—something for me to look into. Considering the differences in the environment,
it’s no surprise that things work differently here. Another thing that is unique to
Kamayani is the cultural celebrations. Celebrating in school gives students the
opportunity to participate in such events, which they might not otherwise, and brings
them much happiness.
This experience has made a lasting impression on me and showed me a new
perspective I didn’t have before. Going forward, I want to take a more active role in my
own community and search for ways to get involved. I am grateful for this opportunity
and for all I have learned at Kamayani these past few days. I would like to commend the
teachers and staff of Kamayani for their endless patience and tireless effort in trying to
make the world a better place for these special kids.

ANNUAL REPORT 2022 – 23

Published on

कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी

KAMAYANI PRASHIKSHAN & SANSHODHAN SOCIETY

१. संस्थेचे वार्षिक वृत्त
उपक्रमसंस्थेची कार्यरत केंद्रे
गोखलेनगर, पुणे ४११०१६कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डिकॅप्ड, शाळा
कामायनी उद्योग केंद्र, कार्यशाळा
संशोधन विभाग
प. म. जोशी ग्रंथालय
सांस्कृतिक सभागृह
निगडी, पिंपरी चिंचवड ४११०४४कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डिकॅप्ड, शाळा
कामायनी उद्योग केंद्र, कार्यशाळा
तळेगाव दाभाडे, ता मावळ, जि पुणेसिंधुताई जोशी उद्योग केंद्र, कार्यशाळा
. घटक संस्था
सन २०२२ – २३ या अहवाल वर्षात शाळेत खालीलप्रमाणे कार्यक्रम झाले
२.१कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डिकॅप्ड, गोखलेनगर
महिनाजून २०२२
दि. १५शाळा सुरू, विद्यार्थ्यांचे स्वागतदि. २१जागतिक योगदिवस
दि. २६राजश्री शाहू महाराज जयंती  
 
महिनाजुलै २०२२
दि. ०७पालखी सोहळादि. १४गुरू पौर्णिमा
दि. २९     श्रीमती दीपाली कवडे यांचे ‘वाचन एक छंद’ यावर भाषणदि. ३०कला शिक्षकांतर्फे पपेट शो  
 
महिनाऑगस्ट २०२२
दि. ०१     नागपंचमी, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीदि.१२गृहविज्ञान वर्धापन दिवस व रक्षाबंधन (दरोडे शाळा व एरंडवणा शाळा) सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर साजरा.  
दि.१३ ते १५स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेत ध्वजारोहणदि.१७     सामूहिक राष्ट्रगीत, टाटा मोटर्स सुवर्ण महोत्सवात विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
दि.१८जन्माष्टमीनिमित्त पुस्तकाची दहीहंडी (पोटसुळ्या मारूती मंडळ)दि.२०कलाशिक्षकांतर्फे पंचतंत्र बोधकथा बाहुली नाट्य
दि.३१संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. अरविंद कुलकर्णी व श्रीमती श्रीलेखाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते श्री गणपती प्रतिष्ठापना
 
महिनासप्टेंबर २०२२
दि. ०२श्री गणपती उत्सावानिमित्त विद्यार्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रमदि. ०५शिक्षक दिन  
दि. ०७बालकल्याण संस्थेत विद्याथ्यांनी नृत्य सादर केलेदि. १२लैंड अ हँड इंडिया (कारागीर) संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना बागकाम प्रशिक्षणाचा शुभारंभ व तसेच इनरव्हिल क्लब ऑफ पुणे यांचेतर्फे शिक्षकदिनानिमित्त सत्कार
महिनाऑक्टोबर २०२२
दि. ०२महात्मा गांधी जयंती, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती व संस्थेच्या संस्थापिका मा. सिंधुताई जोशी जयंतीदि. ०४खंडे नवमी व दांडिया कार्यक्रम
दि. १५डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणादिन साजरा  
दि. १८ ते १९दिवाळी निमित्त तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन. बी. एन. वाय. चे निवृत्त अधिकारी लियेंन्ड्रा मॅडोन्सा यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन    
 
महिनानोव्हेंबर २०२२
दि.१४     पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनदि.२६संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन
दि.२८महात्मा ज्योतीराव फुले यांची पुण्यतिथी
 
महिनाडिसेंबर २०२२
दि. ०३जागतिक अपंग दिनानिमित्त बाल कल्याण संस्थेत झालेल्या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी सहभागी
दि. ०१ ते ०८डिसेंबर दिव्यांग सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांची गुरूकुल संस्थेतर्फे चित्रकला स्पर्धा, कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर, गटांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
दि. २१संस्थेचा ५८ वा वर्धापन दिनदि. २३दिव्यांग व सर्वसामान्य शाळेतील विद्यार्थी यांचे एकत्र ‘स्नेहयात्रा’,
दि. २८जे. के. कंपनी तर्फे विद्यार्थ्यांची फनी गेम स्पर्धा
 
महिनाजानेवारी २०२३
दि. ०२नाताळ कार्यक्रम व नवीन वर्षाचे स्वागतदि. ०३क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती
दि. १३राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीदि. २३नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती
दि. २६प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहण
 
महिनाफेब्रुवारी २०२३
दि. ०१नवक्षितिज संस्था पुणे आयोजित पर्वती चढणे स्पर्धेत १२ मुलांचा सहभाग व ३ मुलांना बक्षिसेदि. १९शिवजयंती कार्यक्रम
दि. २३वार्षिक स्नेहसंमेलन, विषय – निसर्ग / पर्यावरण  
 
महिनामार्च २०२३
दि. ०४होळी सणदि.१०     कै. सागर जोशी यांच्या स्मरणार्थ विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबीर
२.१दि. २०गुढीपाडवा साजरा केला व गुढीपाडवा निमित्त श्री अनिकेत कोंढाळकर यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता वाटपदि. २९श्रीरामनवमी साजरा
 
पूर्वनिदान व शीघ्र उपचार केंद्र
या केंद्राचे काम विशेष शिक्षक श्रीमती दिपाली कवडे व श्रीमती गिरिजा पुरकर यांचेकडे देण्यात आले आहे.
 
पिक्टोग्राम प्रकल्प
तज्ञांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पिक्टोग्रामचे काम शाळेत चालू आहे. शाळेतील ४ शिक्षक सहभागी आहेत. श्रीमती बुक्के, श्रीमती कटके, श्रीमती कवडे व श्रीमती गैंगजे.
गरजेनुसार बनवायची व्हीलचेअर प्रशिक्षणास श्री हेमंत यादव यांचा सहभाग.
२.२गोखलेनगर: कार्यशाळा (प्रमुख : श्री कालिदास सुपाते)
कार्यशाळेत १८ वर्षावरील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण गेली ४४ वर्षे दिले जात आहे. विद्यार्थ्यांची आवड, शारिरीक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन त्यांनां निरनिराळ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.   कार्यशाळेत कागद विच्छेदन यंत्र असून पुणे शहरातील विविध हॉस्पिटल, महाविद्यालये, कंपन्या इत्यादींकडून छेदनासाठी कागद मोफत दिला जातो. तो कागद विच्छेदित करून त्याचा पॅकिंगसाठी व पुनर्वापरासाठी विविध कंपनीत पाठविला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले काम मिळते. हातमाग व यंत्रमागावर कापड विणणे, शिवणकाम, पुस्तक बांधणी व विविध प्रकारचे जॉब वर्कची कामे केली जातात.   कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे भव्य दिवाळी प्रदर्शन संस्थेच्या कामायनी सभागृहात आयोजित केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी निर्देशकांच्या मदतीने तयार केलेल्या विविध वस्तू ठेवल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने आकर्षक व पर्यावरणपुरक आकाश कंदील, पणती, फुलदाणी इ. वस्तू तसेच सुवासिक उटणे, हातमाग व यंत्रमागावर तयार केलेले आकर्षक किचन नॅपकिन्स, टॉवेल्स, बेडशीटस्, पिशव्या, डस्टर्स, कापडी मोबाईल पाऊच, पर्सेस, हँडबॅग, रांगोळी, रांगोळीचे रंग, आकर्षक ग्रिटींग कार्डस् इ. तयार केले जातात. तसेच रंगीत, पांढरी पाकिटे, हातकागदापासून तयार केलेल्या पिशव्या, रजिस्टर, पॅड, मेणबत्या व दिवाळी मेणपणत्या, तसेच हार, तोरण, तयार करून प्रदर्शनात मांडल्या जातात,   कार्यशाळेत यशस्वी व्यवसाय प्रशिक्षण घेवून अनेक विद्यार्थ्यांना नोकरी व काही विद्यार्थी पालकांच्या सहकार्याने व्यवसायही करीत आहेत.
२.२विशेष उल्लेखनीय घटना
महिनाजून २०२२
दि. १५कार्यशाळा सुरू, विद्यार्थ्यांचे स्वागतदि.२४     कार्यकारी विश्वस्त मा. श्रीमती श्रीलेखाताई कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा
 
महिनाजुलै २०२२
दि. १८कामायनी संस्थेच्या संस्थापिका कै. सिंधुताई जोशी यांचा स्मृतीदिन साजरा
 
महिनाऑगस्ट २०२२
दि. ०५हवामान विभागातर्फे हवामान, तापमान, पाऊस इ. येथे मूल्यमापन उपकरणाद्वारे प्रात्यक्षिकदि. ०८योजना गटाची पालकसभा
दि. १५भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र अमृत महोत्सव ध्वजारोहणदि. २६लायन्स क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी गाण्याच्या स्पर्धा
 
महिनासप्टेंबर २०२२
दि. ०८श्री कसबा गणपती विसर्जन मिरवणूकीत कामायनी संस्थेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
 
महिनाऑक्टोबर २०२२
दि. ०१संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुलकर्णी सर यांचा वाढदिवसदि. १८ ते १९दोन दिवस विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळी वस्तूंचे प्रदर्शन
 
महिनानोव्हेंबर २०२२
दि. ०७विद्यार्थी दिन साजरा
 
महिनाडिसेंबर २०२२
दि. ०३जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम बाल कल्याण संस्थेत साजरा करण्यात आला. त्यात कामायनीच्या विद्याथ्यांनी सहभाग घेतलादि. २१संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला
 
महिनाजानेवारी २०२३
दि. १०कै. प. म. जोशी खटाव मिल्स मुंबई स्मृति करंडक व के. ए. लाहोरी स्मृति करंडक मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, स्पर्धेत पुण्यातील व कोल्हापूर, मुंबई, रायगड इ. संघांचा सहभागदि. २५राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली
 
महिनाफेब्रुवारी २०२३
दि. २३वार्षिक स्नेहसंमेलन  
 
महिनामार्च २०२३
दि. ०८जागतिक महिला दिन साजरादि. २८बी. एन. वाय. मेलॉन/स्वयंसेवकांचा विद्यार्थ्यांबरोबर सहभाग
 
२.३निगडी : शाळा (प्रमुख श्रीमती संगीता कुमठेकर)
कार्यशाळा:
 
बाल मार्गदर्शन केंद्र बाल मार्गदर्शन केंद्रात ९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, मानसोपचार तज्ञ डॉ. प्रिया गायकवाड व मानद वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजितसिंह माने यांच्याकडून मुलांची नियमित तपासणी होत असते.
 
दिव्यांग मार्गदर्शन केंद्र: दिव्यांग मार्गदर्शन केंद्रात पिंपरी चिंचवड परिसरातील २५ ते ३० पालकांना सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड म.न.पा. तर्फे दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
 
विशेष उल्लेखनीय घटना
 १शासन आदेशानुसार मार्च २०२२ पासून विद्याध्यर्थ्यांसाठी पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्यात आली, त्यावेळी विद्याथ्यांचे स्वागत बॅन्ड व पुष्पवृष्टीने करण्यात आले. हया वेळी खाऊ वाटप केले गेले.
पिंपरी चिंचवड परिसरात मेट्रोचे आगमन झाल्याने विद्यार्थ्यांनी मेट्रो सफरीचा आनंद लुटला.
स्पेशल ऑलंपिक भारत (SOB) यांच्या तर्फे कामायनी निगडी शाळा पिंपरी चिंचवड परिसरात केंद्र म्हणून घोषित केली गेली. यावेळी (SOB) तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली. ह्या शिबीराचा लाभ ३०० पेक्षा अधिक विद्याथ्यर्थ्यांनी घेतला.
माहे मार्च २०२२ ते एप्रिल २०२३ मध्ये सर्व राष्ट्रीय सण, महापुरूषांच्या जयंती व पुण्यतिथी
शासकीय नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना माहिती देऊन आनंदाने साजरे करण्यात आले
जून २०२२ पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली, त्यावेळी मुलांचे स्वागत औक्षण, बॅन्ड व पुष्प दृष्टीने करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करताना पालक व विद्यार्थ्यांसाठी आठ दिवसांचे योग शिबीर  घेण्यात आले. याचे मार्गदर्शन योग अभ्यासक श्री बबन शिंदे यानी केले.
२.३दिशा अभ्यासक्रमानुसार शिक्षकांनी कामकाजास सुरूवात केली.
‘पावसातील फजिती’ या विषयावर नाट्य महोत्सवाचे आयोजन केले गेले. ह्या नाट्य प्रयोगाचा  मुलांनी पुरेपुर आनंद लुटला
यावर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. हया कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्गाने वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर केले, तसेच पालकांसाठी तिरंगा विषयाला अनुसरून पाककृती व कविता वाचनाची स्पर्धा घेतली. त्यात श्रीमती मनेल ह्यांनी प्रथम क्रमांक  पटाकावला.
१०गणेश उत्सावानिमित्त पालकांसाठी फुलांचा गालीचा रांगोळी स्पर्धा घेतली गेली.
११दि. १९/१०/२०२२ रोजी दिवाळी वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन डी. वाय. पाटील कॉलेजचे चीफ फायनान्स ऑफिसर बिपीन बिहारी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
१२दि. २३/१२/२०२२ व दि. २४/१२/२०२२ रोजी पालक व भावंडासाठी आनंद मेळावा व  विद्यार्थ्यांसाठी कॅम्प फायर व दुगटिकही ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. आई बाबा यांना सोडून एकटे राहणे, दैनंदिन काम स्वतंत्रपणे करणे व स्वतःच्या गोष्टींची काळजी घेणे हे शिकवण्यासाठी हया उपक्रमाचा उपयोग होईल.
१३दि २/२/२०२३ रोजी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन कै, रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडले. यावेळी शाळा, कार्यशाळा, स्वमग्र गट व तळेगाव केंद्राच्या विद्याथ्यर्थ्यांनी कलाविष्कार सादर केला, यावेळी पाहुणे श्री लक्ष्मीकांत डोळे (ज्येष्ठ दिग्दर्शक) उपस्थित होते.  
 
आदर्श पालकश्री व श्रीमती दत्तात्रय शिंदे व श्री व श्रीमती रफिक नदाफ
आदर्श विद्यार्थीकु. चेतन शिंदे, आदर्श विद्यार्थीनी कु. सोनिया नदाफ
 
विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
AWMH आयोजित राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपदाची ट्रॉफी मिळाली
समाजकल्याण आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळेला विजेतेपदाची ट्रॉफी मिळाली
तळेगाव येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये शाळेला उपविजेतेपद व कार्यशाळेला विजेतेपद मिळाले
राज्यस्तरीय योग स्पर्धेत शाळेला व कार्यशाळेला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मिळाली
झेप व इनरव्हील क्लब यांनी भरवलेल्या मतिमंद, स्वमग्न गटाच्या स्पर्धेमध्ये शाळेला विजेतेपद मिळाले
रोटरी क्लब व बालकल्याण यांनी थो बॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात शाळेला  कार्यशाळेला विजेतेपद मिळाले
संस्कार केंद्र पिरंगुट यांनी विविध खेळ व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात शाळेला व कार्यशाळेला विजेतेपद मिळाले
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कु. चेतन शिंदे याची पोहणे या स्पर्धेमध्ये निवड झाली
सकाळ चित्रकला स्पर्धेमध्ये सर्व विद्याथ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला
१०लायन्स क्लब दत्तवाडी यांच्या तर्फे आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक  मिळाला
११जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेमध्ये कु. सारा करडे हिला प्रथम क्रमांक मिळाला
१२दि डाऊन सिड्रोम नॅशनल गेम्स हैद्राबाद येथे झालेल्या मैदानी खेळाच्या स्पर्धेमध्ये कु. सारा  करडे हिला सुवर्ण व रौप्य पदक मिळाले
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
 
या वर्षातील महत्वाचे प्रकल्प देणगी
 १डायना के ऑटोमोटीव्ह स्टॅम्पिंग कंपनीकडून अद्ययावत स्वयंपाक घर (किचन) देणगी दाखल मिळाले. या कंपनीचे संचालक श्री निशांत सागर व श्रीमती मैथिली सागर तसेच कंपास इंडिया  कंपनीचे रिजनल शेफ श्री अमित बोरसे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्‌द्घाटन झाले
बजाज फायनान्स लि. यांनी सामाजिक कर्तव्य निधिमधून गोखलेनगर शाखा व निगडी शाखा येथील इमारत बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून दिला
सिनेक्रॉन कंपनीकडून पाच संगणक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कक्षा रुंदावण्यासाठी भेट मिळाली
लायन्स ब ऑफ फिनीक्स व टाटा ब्ल्यू स्कोप यांच्या तर्फे सौरऊर्जा प्रकल्पाचे (Solar Systems) व पाणी साठवण प्रकल्पाचे (Rainwater Harvesting) उद्घाटन झाले.
शुभहस्ते – डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश कोठावदे व टाटा ब्ल्यू स्कोपचे पदाधिकारी
श्री. गोविंद भट      
निगडी शाखेला केएसबी कंपनीकडून पाच स्मार्ट बोर्डस् देणगी दाखल मिळाले
के. एस. बी. पंप कडून १ नवीन कागद छेदनयंत्र मिळाले
निवृत्ती इ.
२.४तळेगाव दाभाडे: सिंधुताई जोशी उद्योग केंद्र (प्रमुख श्रीमती शिल्पा जाधव)
मावळ परिसरातील गरज ओळखून प्रौढ दिव्यांग (मतिमंदांसाठी) संस्थेतर्फे सिंधुताई जोशी उद्योग केंद्र, जुना मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव दाभाडे लिंब फाटा येथे दोन एकर जागेत दि. ११ मे २०१६ रोजी सुरू करण्यात आलेले आहे. सदर केंद्रात तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, आंबी, वराळे, चाकण रोड, धामणे, सोमाटणे फाटा, देहूरोड, किवळे, चिंचोलो, विकासनगर, माळवाडी, रावेत, थॉमस कॉलनी, साईनगर, गहुंजे इ. परिसरातील प्रशिक्षणार्थी येतात.   या केंद्रात प्रशिक्षणार्थीच्या पुनर्वसन व भविष्याच्या दृष्टीने कागदी पिशव्या, सुतळीपासून पायपुसणे, कृत्रिम फुले, फळबागांची निगा राखणे, कागद छेदणे, दिवाळीसाठी शेणापासून पंचगव्य, पणत्या बनवणे, मातीच्या पणत्या रंगवणे, फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करणे, बीज गोळे, सेंद्रिय खत तयार करणे, मण्याच्या माळा, फळांच्या सालीपासून फिनेल तयार करणे, चहाचा मसाला तयार करणे इ. कामे प्रशिक्षणार्थी करतात, या केंद्रास या परिसरातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
 
विशेष उल्लेखनीय घटना
महिनाएप्रिल २०२२
दि. ११महात्मा फुले जयंती
 
महिनामे २०२२
दि. ३१अहिल्याबाई होळकर जयंती
 
महिनाजून २०२२
दि. ०६आषाढी कार्तिकी निमित्त संस्थेत दिंडीचे आयोजनदि. २१जागतिक योगदिनानिमित्त प्रशिक्षणार्थीनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली
दि. ३०उद्योग केंद्रामधील आंबा मोहोत्सव, फळांची विक्री करण्यात आली सर्व प्रशिक्षणार्थीना आंबे वाटप करण्यात आले. डॉ. पल्लवी वर्तक, प्राचार्य, स्नेहवर्धन   मंडळ, सोशल आणि एज्युकेशन ट्रस्ट, बी.एड. कॉलेज, तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून त्यांचे प्राध्यापक व विद्यार्थीनी संस्थेला १५ वृक्षांची रोपे देवून वृक्षारोपण  
 
महिनाजुलै २०२२
दि. ०६आषाढी वारीनिमित्त पालखी सोहळादि.  ०८प्रशिक्षणार्थीची श्री सत्यसाई मंदिर, हाडशी येथे सहल  
 
महिनाऑगस्ट २०२२
दि.  ०३नागपंचमीदि. ११     सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम व गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी
दि. १५स्वातंत्र्यदिन निमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम श्री प्रवीण छाजेड, पुणे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री आशुतोष भुपटकर सर यांच्या उपस्थितीत
 
महिनाऑक्टोबर २०२२
दि. ११अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कोजागिरी पौर्णिमा निमित्त प्रशिक्षणार्थीना मसाला दूध व खाऊ वाटप कलेदि. १७दिवाळी निमित्त तळेगाव विभागामध्ये दिवाळी प्रदर्शन व पालक मेळावा आयोजित
दि. ०९दिवाळी निमित्त सुजन रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट दामले हॉल, लॉ कॉलेज रोड व दि. १८ ऑक्टोबर रोजी कामायनी संस्थेचे मुनोत सभागृहात दिवाळी वस्तूंचे प्रदर्शन
 
महिनाडिसेंबर २०२२
दि. २३संस्थेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहयात्रेत सहभाग
 
महिनाजानेवारी २०२३
 डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालय तळेगाव दाभाडे, यांच्याशी प्रशिक्षणार्थीच्या मोफत आरोग्य तपासणी संदर्भात कराराप्रमाणे सर्व प्रशिक्षणार्थीचे वैद्यकीय तपासणी दि. १० जानेवारी २०२३ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत केली गेली
 
महिनाफेब्रुवारी २०२३
दि. ०२कामायनी निगडी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सहभाग घेतलादि. १०जपालुपी अश्वारोहण केंद्र, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे सहल
 
महिनामार्च २०२३
दि. २१मराठी नववर्षाच्या आणि गुढी उभारून गुढीपाडव्याचा कार्यक्रम साजरा
 
संस्था भेटी
अहवाल काळात श्रीमती अश्विनी वनारसे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, डॉ. पल्लवी वर्तक, प्राचार्य, स्नेहवर्धन मंडळ, सोशल आणि एज्युकेशन ट्रस्ट, बी.एड. कॉलेज, तळेगाव दाभाडे, मा. रोटे, अध्यक्ष श्री मनोज ढमाले, इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे अध्यक्षा, श्रीमती वैशाली दाभाडे, ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. सुमतीलाल शहा, हितेश चंपालाल सुराणा, राहुल शर्मा, प्रविण छाजेड, शुभांगी बैंगळे, सुशील परदेसी, अमित कुलकर्णी, लपालीकर, दिलीप सुगवेकर, महेश महाजन, अनन्या बाफना, श्रावणी पांग, रोहन भिरूड, इ. मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील कार्यास व भविष्य काळातील योजनांसाठी शुभेच्छा व संपूर्ण सहकार्य करण्याचे सांगितले.
 
निवृत्ती इ.
काका जवळेकर, निदेशक, यांचे दि. १५ जुलै २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना  श्रध्दांजली वाहण्यात आली
केंद्राचे पहिले प्रमुख श्री दिलीप भोसले यांचे दि. २० डिसेंबर २०२२ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली
२.५संशोधन विभाग, गोखलेनगर (संशोधक डॉ. आशा देशपांडे)
मुलींच्या मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनाच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जास्तीत जास्त पालक व शिक्षक यांजपर्यंत पोचविण्यासाठी दोन प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. एक म्हणजे संशोधनविषयक नियतकालिकांमध्ये लेख लिहून तसेच संबंधितांमध्ये जागृतीसाठी व्हिडीओ बनविणे या मार्गानी संशोधनातील निष्कर्षांचा प्रसार केला जात आहे. या संशोधनावर आधारित एक प्रारूप प्रवापार शिक्षण संच तयार करण्याची देखील कल्पना आहे
दैनंदिन जीवन कौशल्यासाठी चित्रमालिकेचा वापर या प्रकल्पातील दुसरा टप्पा पार पडला असून सर्व ११ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन चिन्त्र मालिका तयार होत आल्या आहेत, त्यांचा वापर करून तीव्र व गंभीर स्तरावरच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्य आत्मसात करण्याच्या पातळीत लक्षणीय फरक पडतो का हे तपासण्याचे काम सुरू झाले आहे. ते या वर्षअखेरीस संपून काही ठोस निष्कर्ष हाती येतील
२.६. . जोशी ग्रंथालय डिजिटल लायब्ररी, गोखलेनगर
ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह ५००० च्या वर असून ते सर्व नागरिकांसाठी नाममात्र शुल्कावर उपलब्ध आहे
ग्रंथालयाची सभासद संख्या २५० पेक्षा अधिक आहे परंतु नव्या तंत्रज्ञानामुळे पुस्तके आंतरजालावर   उपलब्ध असल्याने ग्रंथालयाचा वापर कमी होत आहे
ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त १ एप्रिल २०२३ रोजी श्री अशोक गोपाळ यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकावर व्याख्यान झाले
प्रदीप मोघे
खजिनदार
सुहास नगरे
कार्यवाह
श्रीलेखा कुलकर्णी
उपाध्यक्ष
आशुतोष भुपटकर
अध्यक्ष
सांख्यिकी
विद्यार्थी संख्या
केंद्रवर्षारंभनवीन प्रवेशसोडून गेलेवर्षअखेर
शाळा गोखलेनगर१२४४७४७१२४
कार्यशाळा गोखलेनगर१००३८३४१०४
प्रौढ गट गोखलेनगर३३०२०९२६
शाळा निगडी७७२३२३१००
शाळा निगडी पटाव्यतिरिक्त००२४००२४
कार्यशाळा निगडी५८०९०६६१
कार्यशाळा तळेगाव२४۹۹०२३३
कर्मचारी संख्या (मंजूर) नियुक्त
केंद्रेव्यवस्थापन व शैक्षणिककार्यालयीनसेवक वर्ग
शाळा गोखलेनगर(२९) १७(०२) ०९(१८) १०
कार्यशाळा गोखलेनगर(०७) ०६(०२) ०२(४) ०८
शाळा निगडी१८) ११(२) २(६) ०३
शाळा निगडी सर्व मानद०४०००१
कार्यशाळा निगडी सर्व मानद०२०००३
कार्यशाळा तळेगाव सर्व मानद०२०१०४
शाळा गोखलेनगर सर्व मानद०००२०३
कार्यशाळा गोखलेनगर सर्व मानद०३०००३
देणग्या
नेहमीप्रमाणे यंदाही देणगीदारांचा उदार आश्रय संस्थेला लाभला. त्यापैकी काही देणग्यांचा उल्लेख येथे आवश्यक आहे.
अ.क्रदेणगीदाराचे नावरक्कम रुपये
 1बजाज फायनान्स लिमिटेड1,16,00,000/-
 2सास रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट6,90,000/-
 3श्रीमती विमलाबाई जठार (जीजी) निलकंठ जठार ट्रस्ट6,00,000/-
 4डायना के अॅटोमोटिव स्टॅम्पिंग प्रा.लि.   11,61,590/-
 5टाटा ब्लूस्कोप स्टील प्रा.लि.4,00,000/-
 6श्री प्रविण कुमार पात्रो 90,000/-
 7श्री चिराग शहा1,81,500/-
 8श्रीमती चंद्रकला शेट्टी1,80,000/-
 9एअर व्हॉइस मार्शल नितीन वैद्य1,50,000/-
 10राममणी आयंगर चॅरिटेबल ट्रस्ट     1,50,000/-
 
वस्तुरूप देणग्या
 1के. एस. बी. पंप कंपनीकडून  ०५ स्मार्टबोर्ड
आभार
खालील वैद्यकीय तज्ञांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा मानद रूपात दिली त्याबद्दल त्यांचे  संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार
गोखलेनगर  डॉ. जयदीप पाटील, मानसोपचार तज्ञ  निगडी  डॉ. प्रिया गायकवाड मानसोपचार तज्ञ
डॉ. रणजितसिंह माने मानद वैद्यकीय अधिकारी
 
खालील पालक प्रतिनिधींनी स्थानिक व्यवस्थापन समित्यांवर प्रतिनिधित्व केले,
गोखलेनगर  निगडी
शाळाश्रीमती सोनाली पाटीलशाळाश्रीमती रोशनी सपकाळ
कार्यशाळाश्रीमती बीना रावकार्यशाळाश्री. दिलीप सुगवेकर
 
व्यवस्थापन
विश्वस्त मंडळ
 
श्रीमती  श्रीलेखा कुलकर्णीकार्यकारी विश्वस्तडॉ. अरविंद कुलकर्णीविश्वस्त
डॉ. आशुतोष भुपटकरविश्वस्त
 
संस्था अध्यक्षडॉ. अरविंद कुलकर्णी
 
कार्यकारिणी  (०१ एप्रिल २०२३ – ३१ मार्च २०२५)
 
अध्यक्षडॉ. आशुतोष भुपटकरउपाध्यक्षश्रीमती श्रीलेखा कुलकर्णी
 
कार्यवाहअॅड. सुहास नगरेखजिनदारश्री. प्रदीप मोघे
 
सहकार्यवाहश्री. अशोक कुलकर्णीसदस्यश्रीमती उत्तरा पंडित
 
सदस्यश्रीमती सुप्रभा सावंतसदस्यडॉ. जान्हवी थत्ते
 
सदस्यडॉ. आशा देशपांडेसदस्यश्री. जावेद इनामदार
 
सदस्यअॅड. दीपा खरेसदस्यश्रीमती कलिका मुजुमदार
 

कामायनी, गोखलेनगर वार्षिक स्नेहसंमेलन 2024

Published on

कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डीकॅप्ड व कामायनी उदयोग केंद्र गोखलेनगर, पुणे

गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी

कामायनी सभागृह, गोखलेनगर, पुणे 411016

अध्यक्ष     – मा. डॉ. अरविंद कुलकर्णी (अध्यक्ष, कामायनी)

प्रमुख पाहुणे – मा. डॉ. प्रचिती सुरु – कुलकर्णी (नाटय व सिनेकलावंत)

डॉ. आशुतोष भुपटकर, कर्याध्यक्ष, कामायनी

श्रीमती श्रीलेखाताई कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त, कामायनी

यांचे उपस्थितीत संपन्न झाला

कामायनी उदयोग केंद्र, गोखलेनगर, पुणे “भक्ती गीत”   

कामायनी उदयोग केंद्र, गोखलेनगर, पुणे “चित्रपट गीत”

कामायनी उदयोग केंद्र, गोखलेनगर, पुणे “भक्ती गीत”   

कामायनी उदयोग केंद्र, गोखलेनगर, पुणे “स्फुर्ती गीत”

कामायनी उदयोग केंद्र, गोखलेनगर, पुणे “कोळी गीत”

कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डीकॅप्ड, गोखलेनगर, पुणे “प्रार्थना”

कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डीकॅप्ड, गोखलेनगर, पुणे “शेतकरी”

कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डीकॅप्ड, गोखलेनगर, पुणे “मालिका गीत”

कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डीकॅप्ड, गोखलेनगर, पुणे “अभिनय”

कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डीकॅप्ड, गोखलेनगर, पुणे “लोकगीत”

कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डीकॅप्ड, गोखलेनगर, पुणे “बडबड”

लैंगिक छळ प्रतिबंध धोरण

Published on

कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी

लैंगिक छळ प्रतिबंध धोरण

अनुक्रमणिका

१. उद्देश

२. व्याप्ती

३. व्याख्या

४. अंतर्गत समिती

५. तक्रार दाखल करणे

६. समझोता

७. चौकशी 

८. अंतरिम उपाय

९. निराधार तक्रार

१०. साधार तक्रार

११. खोटी तक्रार

१२. बदला घेणे

१३. गोपनीयता व व्यक्तिगतता

१४. दाद मागणे [अपील ]

१५. कर्मचाऱ्यांची जबाबदारी

१६. लागू असलेले कायदे

परिशिष्ट १: अंतर्गत समितीचे गठन व भूमिका

परिशिष्ट २: लैंगिक छळाच्या तक्रारीत हवा असलेला तपशील

१. उद्देश

सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, निकोप आणि छळमुक्त वातावरण मिळावे यासाठी कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी कटिबद्ध आहे. असे छळमुक्त वातावरण कायम टिकावे यासाठी कार्यस्थानी महिलांवर लैंगिक अत्याचार [प्रतिबंध, बंदी आणि निवारण] २०१३, च्या तरतुदींना अनुसरून हे धोरण आखण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे हा मुख्य उद्देश आहे. लैंगिक छळ आणि तदनुषंगिक बाबींविषयी तक्रारीचे निवारण करण्यासंबंधी त्यात तरतूद केलेली आहे.

२. व्याप्ती

हे धोरण खालीलप्रमाणे लागू होते :

१. संस्थेची सर्व केंद्रे आणि कार्यक्षेत्रे

२. खालीलपैकी सर्व व्यक्ती

  • कर्मचारी
  • कामगार
  • सल्लागार
  • प्रशिक्षणार्थी [ परिवीक्षाधीन, कायम, करारबद्ध ]
  • ग्राहक
  • व्यवसायदाते
  • पुरवठादार वा
  • कोणीही अन्य व्यक्ती जिचा कामायनी प्र व सं सोसायटीशी व्यावसायिक संबंध आहे. ३

३. सर्व लिंगी व्यक्ती ज्यात स्त्री, पुरुष व लिंगातीत येतात.

४. कामायनी प्र व सं सोसायटीशी कामाचा नियमित संबंध असल्यामुळे घडलेली कामाच्या वेळेतील अथवा आधी वा नंतरची घटना.

३. व्याख्या

१. पॉश कायदा: कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार [प्रतिबंध, बंदी व निवारण] २०१३ चा कायदा

२. संस्था: कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी पुणे

३. पीडित: पुढे ३[७]   मध्ये दिल्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार भोगावा लागलेली व्यक्ती

४. वादी /तक्रारदार: स्वतः लैंगिक अत्याचार अनुभवलेली किंवा असा अत्याचार झालेल्या अन्य व्यक्तीच्या किंवा तिच्या कायदेशीर वारसाच्या अनुमतीने तक्रार दाखल करणारी व्यक्ती.

५. प्रतिवादी: ज्या व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार आली आहे.

६. नियोक्ता: कामाच्या ठिकाणचे व्यवस्थापन, पर्यवेक्षण, नियंत्रण ठेवणारी आणि कर्मचाऱ्यांबद्दलची कायदेशीर  कर्तव्ये पार पाडणारी व्यक्ती

७. कार्यस्थळ : नियत कामे, कर्तव्ये पार पाडत असताना अथवा कामाच्या निमित्ताने भेट दिलेली सर्व ठिकाणे कार्यस्थळ या संज्ञेत येतात. खालील ठिकाणे पहा.

  • कार्यालयांच्या सर्व जागा
  • ग्राहक वा पुरवठादार यांची ठिकाणे, सभा, परिषदा, प्रशिक्षण इ साठी गेलेली ठिकाणे
  • संस्थेने पुरविलेली वाहन व्यवस्था, जसे की बस वा टॅक्सी
  • संस्थेने पुरविलेली संदेश वहन यंत्रणा, जसे की संगणक, फोन, इमेल इ०
  • संस्था पुरस्कृत सहल, पर्यटन, मनोरंजन कार्यक्रम होणारी ठिकाणे
  • संस्थेने पुरविलेली निवास व्यवस्था, जसे की वसतिगृह, हॉटेल इ ०

दूरस्थ प्रणालीद्वारे निवासातून काम करीत असल्यास निवास स्थान ‘कार्यस्थळ’ या व्याख्येत बसते. संस्थेव्यतिरिक्त इतरांनी आयोजिलेल्या सभा समारंभाचा समावेश कार्यस्थळात होणार नाही. तथापि

  • जर अशा बाहेरील समारंभात संस्थेच्या कर्मचाऱ्याचा संस्थेच्याच इतर कर्मचाऱ्याने लैंगिक छळ केला असल्यास आणि त्यामुळे संस्थेचा लौकिक कलंकित होणार असेल, कामाच्या ठिकाणचे वातावरण दूषित होणार असेल किंवा पीडित व्यक्तीच्या मनावर आघात झाल्याने कार्यक्षमतेत विघ्न येणार असेल तर या धोरणान्वये कारवाई करता येईल.

८. लैंगिक छळ: प्रत्यक्ष वा सूचित मार्गाने  लैंगिक स्वरूपाची अगांतुकपणे केलेली नकोशी असलेली शारीरिक, शाब्दिक अथवा शाब्दिकेतर कृती.  यात खालील गोष्टींचा – पण तेवढ्याच नव्हे – समावेश होतो.

  • व्यक्तीचा चेहरा, शरीर वा पोशाख यावरून टोमणे मारणे वा हेटाळणी करणे
  • वारंवार छचोर संभाषण करणे व पुनःपुन्हा बाहेर भेटण्याविषयी आग्रह करणे
  • स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत राहणे अथवा दुसऱ्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चौकशा करणे
  • घृणास्पद चित्रे, व्हिडियो अथवा मजकूर पाठवणे अथवा दाखवणे
  • अवघडून टाकणारा किंवा तिरस्करणीय वाटणारा शरीर स्पर्श वा जवळीक
  • पाठलाग करणे
  • लैंगिक स्वरूपाच्या अफवा इतरांबद्दल पसरवणे
  • दुसऱ्यांच्या हालचाली मध्ये अडथळा आणणे
  • दुसऱ्या व्यक्तीकडे अशा रीतीने रोखून पाहणे जेणेकरून ती व्यक्ती अवघडली पाहिजे.
  • लैंगिक दृष्ट्या घृणास्पद शेरेबाजी करणे, चेहऱ्याने वा हातवारे करून घृणा उत्पन्न करणे.
  • प्रकट अथवा आडवळणाने लैंगिक आशय असणारे वर्तन जर खालील परिस्थितीत होत असेल तर तेही छळ गणले जाऊ शकेल.

< लैंगिक उपभोगाच्या बदल्यात थेट वा सूचकपणे काही सुविधा वा लाभ  देऊ केले जात आहेत

< लैंगिक मागणी नाकारल्यास थेट वा सूचकपणे नुकसान करण्याची धमकी देणे

< भविष्यातील बढती व अन्य हुद्द्यांसंबंधी थेट वा सूचक इशारा देणे

< प्रतिकूल आणि भयग्रस्त शैक्षणिक वातावरण निर्माण करणे

< व्यक्तीची सुरक्षितता, आरोग्य, प्रतिष्ठा आणि शारीरिक अस्मिता यांना धक्का लावणारी अवहेलनात्मक वागणूक

४. अंतर्गत समिती

१. पॉश कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी संस्थेने अधिकृतपणे अंतर्गत समिती [आयसी ] नेमलेली आहे. लैंगिक छळाच्या तक्रारी स्वीकारणे आणि त्यांचे निवारण करणे हे आयसी  चे प्रमुख काम आहे.

२. आयसीची रचना पुढीलप्रमाणे

  • पीठासीन अधिकारी – वरिष्ठ पदावरील महिला अधिकारी समितीच्या अध्यक्षस्थानी असतात.
  • तीन अंतर्गत सदस्य – हे संस्थेतील प्रमुखपदावर काम करणारे सदस्य आहेत.
  • तज्ज्ञ सदस्य – बाहेरील संस्थेतील या विषयातील जाणकार सामाजिक कामाचा अनुभव असणारी वा कायद्याचे ज्ञान असणारी व्यक्ती .

३. किमान ५० टक्के सदस्य या महिला असल्या पाहिजेत. आयसीची रचना आणि कार्ये परिशिष्ट १ मध्ये विशद केली आहेत.

४. आयसीच्या सभेसाठी गणसंख्या ३ सदस्य ही आहे.

५. पॉश कायद्यानुसार सदस्यत्वाची मुदत तीन वर्षे आहे.

६. आयसी ही सर्व केंद्रांसाठी एकच आहे.

५. तक्रार दाखल करणे

१. पीडित व्यक्ती संस्थेला kamayani.society <at>gmail.com वर इमेल पाठवू शकते किंवा कोणाही आयसी सदस्याला लेखी तक्रार देऊ शकते.

२. घटना घडल्यापासून तीन महिन्यांच्या आत तक्रार देणे आवश्यक आहे. जर घटनांची मालिका असेल तर शेवटच्या घटनेपासून तीन महिने मोजले पाहिजेत.

३. पुरेसे कारण असल्यास आयसी आपल्या अधिकारात कालमर्यादा शिथिल करू शकते. 

४. निनावी तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

५. पीडित लेखी तक्रार करण्यास असमर्थ असेल तर पीठासीन अधिकारी वा आयसीचे सदस्य अशा पीडितेला लेखी तक्रार देण्यासाठी सर्वतोपरी मदत करतील.

६. तक्रार करण्यास पीडिता असमर्थ असल्यास :

    > पीडिता शारीरिक कारणाने तक्रार करण्यास असमर्थ असेल तर खालील पैकी कोणीही मदत करू शकेल

  • मित्र वा नातलग
  • सहकारी
  • पीडितेने लेखी संमती दिलेली व घटना माहीत असणारी कोणीही व्यक्ती

    > बौद्धिक अक्षमतेमुळे पीडित तक्रार करण्यास असमर्थ असल्यास खालील पैकी कोणीही मदत करू शकेल

  • मित्र वा नातलग
  • विशेष शिक्षक
  • पदवीधारक मानसोपचार तज्ज्ञ वा मानसशास्त्रज्ञ
  • पालक वा अन्य अधिकारी ज्यांच्या अधिकारात पीडितेला उपचार अथवा परिचर्या दिली जात आहे.
  • घटनेबद्दल माहिती असणारी कोणीही व्यक्ती वरीलपैकी एका व्यक्तीबरोबर संयुक्तपणे तक्रार करू शकेल.

  > पीडितेच्या असमर्थतेचे इतर कोणतेही कारण असल्यास तिच्या लेखी संमतीने घटनेची माहिती असणारी कोणीही व्यक्ती तक्रार करू शकेल.

   > पीडित व्यक्ती मृत झाल्यास तिच्या कायदेशीर वारसदारांच्या लेखी सम्मतीने घटनेची माहिती असणारी कोणीही व्यक्ती तक्रार करू शकेल.

७. लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या दिवसापासून सात दिवसांच्या आत आयसी तक्रारीची प्रत प्रतिवादीस पाठवेल.

८. तक्रारीची प्रत मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत प्रतिवादीने साक्षीदारांचे नाव-पत्ते इ० व पुराव्याची  कागदपत्रे इ ०सह आपला जबाब आयसीला सादर केला पाहिजे.

६. समझोता

१. तक्रार दाखल झाल्यानंतर पीडितेने इच्छा दर्शवल्यास आयसी समझोता घडवून आणण्यासाठी पावले उचलेल.

२. तक्रार दाखल झाल्यापासून ३० दिवसांच्या आत समझोता घडवून आणता येईल.

३. समझोत्याच्या  चर्चेचे  इतिवृत्त  लेखी स्वरूपात ठेवले  जाईल. कोणतीही आर्थिक देवघेव ठरवली जाणार नाही. या इतिवृत्ताच्या प्रती नियोक्ता, वादी आणि प्रतिवादी यांना देण्यात येतील.

४. समझोता झाला असल्यास आयसी मार्फत कोणतीही चौकशी केली जाणार नाही.

७. चौकशी

१. कोणताही समझोता झाला नसेल वा समझोत्याच्या अटींचे पालन होत नसेल तर आयसी तक्रारीची चौकशी करेल व तसे वादी व प्रतिवादी यांना कळवेल.

२. जर वादी व प्रतिवादी साक्षीदार व पुरावा सादर करू इच्छित असतील तर त्यांनी आयसीला तसे लेखी कळविणे आवश्यक आहे.

३. जर वादी व प्रतिवादी पुराव्याची कागदपत्रे सादर करू इच्छित असतील तर त्यांनी मूळ पत्रे  सादर केली  पाहिजेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कागदपत्रे सादर करताना त्यांचे मूळ रूप कायम राहील याची दक्षता घेतली पाहिजे.

४. आयसी पैकी एखादी  सदस्य पूर्वग्रह प्रभावित असेल किंवा हितसंबंधांनी बांधली असेल तर तिने चौकशीमधून आपणास वगळावे असे आयसीला कळविले पाहिजे. वादी, प्रतिवादी वा साक्षीदार यांजपैकी कोणीही आयसी सदस्याचा पूर्वग्रह वा हितसंबंध हा मुद्दा पुढे आणल्यास त्यावरचा अंतिम निर्णय पीठासीन अधिकारी घेतील. तसेच अशा परिस्थितीत सुनावणी साठी आयसी पैकी कोण उपस्थित राहतील हे त्या ठरवतील.

५. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना अनुसरून आयसी चौकशीचे कामकाज चालवेल. वादी व प्रतिवादी यांना साक्षीपुरावे सादर करण्याची तसेच तपासण्याची योग्य व पुरेशी संधी दिली जाईल.

६. तक्रार मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या मुदतीत आयसी आपले कामकाज संपवेल.

७. चौकशी अहवाल तयार करण्यापूर्वी आपली वस्तुस्थिती दर्शक तथ्ये आयसी तर्फे वादी व प्रतिवादी यांना कळविली जातील. त्याबद्दल काही आक्षेप असल्यास ते आयसीला कळविले गेले पाहिजेत.

८. चौकशीचे कामकाज संपल्यानंतर दहा दिवसांच्या आत आयसी चौकशीतून काढलेले निष्कर्ष आणि शिफारशींसह अहवाल तयार करून नियोक्त्यांस सादर करेल व अहवालाच्या प्रती वादी व प्रतिवादी यांना देण्याची व्यवस्था करेल.

९. अहवाल मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत शिफारशींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नियोक्त्यांवर राहील.

१०. जर वादी ने आपला पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा इरादा आयसीस चौकशी पूर्वी, दरम्यान वा नंतर कळविला असेल तर आयसी वादी ला पूर्ण सहकार्य करेल.

८. अंतरिम उपाय

चौकशी चालू असताना वादीने मागणी केल्यास आयसी खालीलपैकी कोणताही अंतरिम आदेश देऊ शकेल:

अ.  प्रतिवादीने वादीच्या कार्यपूर्तीचे मूल्यमापन करण्यास प्रतिबंध करणे

ब.  नेहमीच्या उपलभ्य रजेशिवाय जास्तीत जास्त ३ महिन्यांची पगारी रजा देणे

क. वादी वा प्रतिवादी यांची अन्य केंद्रात बदली करणे

ड. इतर कोणतीही योग्य ती सुटकावजा कृती

९. निराधार तक्रार

ज्यावेळेस आयसी अशा निष्कर्षाप्रत येते की प्रतिवादींवरील आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि त्याच्याविरुद्ध कोणतीही कृती करता  येणार नाही, तेव्हा ती तक्रार निराधार समजली जाईल.

१०. साधार तक्रार

ज्यावेळेस आयसी अशा निष्कर्षाप्रत येते की प्रतिवादींवरील आरोप सिद्ध झालेले आहेत, त्यावेळेस खालीलपैकी कृतींची शिफारस आयसी करू शकते.

अ. निलंबन

ब. सेवा समाप्ती

क. लेखी ताकीद

ड. पदोन्नती वा वेतनवाढ रोखणे

इ. प्रतिवादीने क्षमा याचना करणे

फ. निर्भर्त्सना वा ठपका ठेवणे

ग. समुपदेशन

अथवा कोणतीही इतर योग्य कृती

११. खोटी तक्रार

जर आयसी ला असे आढळून आले की वादी अथवा अन्य कोणी व्यक्ती हेतुतः द्वेषापोटी प्रतिवादी विरुद्ध आरोप केले आहेत किंवा बनावट आणि दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करीत आहे तर आयसी नियोक्त्याकडे अशी शिफारस करू शकते की खोटे आरोप किंवा खोटे पुरावे देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कृती करावी. अर्थात केवळ सबळ वा पुरेसा पुरावा देता आला नाही म्हणून एखादी तक्रार खोटी ठरविता येणार नाही.

१२. बदला घेणे

१. वादी अथवा साक्षीदार यांच्याविरुद्ध बदला घेण्याची किंवा संधी डावलण्याची कृती करण्यास संस्थेत मज्जाव आहे.

२. आयसीला असे आढळून आले की प्रतिवादी असलेली व्यक्ती प्रत्यक्ष किंवा आडवळणाने बदला घेणे किंवा मुद्दाम वंचित ठेवणे असे प्रकार अवलंबित आहे, तर त्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईची शिफारस नियोक्त्याकडे ती करू शकते.

३. कोणाही व्यक्तीला जर लैंगिक छळाची घटना निदर्शनास आणणे वा अशा प्रकरणी साक्ष देणे यामुळे बदला वा हेतुतः डावलले गेल्याचा अनुभव आला असेल तर तिने ती बाब तात्काळ आयसी च्या निदर्शनास आणावी.

१३. गोपनीयता व व्यक्तिगतता

१. आलेल्या तक्रारींची नोंद आयसी द्वारे एका स्वतंत्र दप्तरात ठेवली जाईल व तक्रारीचा तपशील केवळ गरजेच्या तत्त्वावर प्रकट केला जाईल.

२. संस्था वादी, प्रतिवादी आणि साक्षीदार यांच्या संबंधाने गोपनीयता ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

३. गोपनीयतेच्या तरतुदींचा भंग करणाऱ्या व्यक्तीला पॉश कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईस सामोरे जावे लागेल.

१४. अपील

१. आयसी च्या निष्कर्ष वा शिफारशींमुळे व्यथित झालेली व्यक्ती संस्थेच्या कार्यकारिणीकडे आयसी चा अहवाल प्राप्त झाल्यापासून एकवीस दिवसांच्या आत अपील करू शकेल. अपील मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत कार्यकारिणी अपिलावर आपला निर्णय देईल.

२. कार्यकारिणीने अपिलावर दिलेल्या आदेशामुळे अथवा तसा आदेश अंमलात न आणल्यामुळे व्यथित झालेली व्यक्ती पॉश कायद्यानुसार नेमलेल्या न्यायालय अथवा प्राधिकरणाकडे दाद मागू शकेल.

१५. कर्मचाऱ्यांची जबाबदारी

१. आपले वर्तन या धोरणानुसार राहील हे पाहण्याची जबाबदारी प्रत्येक कर्मचाऱ्यावर राहील.

२. सर्व कर्मचाऱ्यांनी हे धोरण वाचणे आवश्यक आहे. त्यांना त्याच्या कोणत्याही भागाबद्दल शंका असल्यास तिचे निरसन त्यांनी आयसी च्या कोणाही सदस्यांकडून करून घेणे अपेक्षित आहे.

१६. लागू असलेले कायदे

१. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६

२. महिला लैंगिक अत्याचार [प्रतिबंध, प्रतिषेध व निरसन ] अधिनियम २०१३ 

परिशिष्ट १

आयसी ची रचना व पदभार

नावपददूरध्वनी क्रमांकइमेल
श्रीम दीपा खरेपीठासीन9422302898deepa.vkhare@gmail.com  
श्रीम संध्या कवाष्टेअंतर्गत सदस्य9960070856sandhyakavashte814@gmail.com
श्रीम माधवी थाडेअंतर्गत सदस्य9922146158madhavi.thade@gmail.com
श्री विजय टोपेअंतर्गत  सदस्य9921665674vmtope@gmail.com
श्रीम प्राजक्ता उ वितज्ज्ञ9371675444prajaktasmile@gmail.com

परिशिष्ट २

लैंगिक छळाच्या तक्रारीत द्यावयाचा तपशील

१. तक्रार दाखल केल्याचा दिनांक

. पीडित व्यक्ती ची माहिती :

नाव –                                                                            हुद्दा –

विभाग/केंद्र –

मो क्रमांक                                                                     ईमेल –

. पीडित व्यक्तीच्या वतीने तक्रार दाखल असल्यास तक्रारदाराची माहिती:

नाव –                                                                            हुद्दा –

विभाग/केंद्र –

मो क्रमांक                                                                     ईमेल –

पीडितेबरोबरचे नाते [जसे मित्र, सहकारी इ ]

तक्रार करण्यास पीडिता का असमर्थ आहे ते कारण:

४. प्रतिवादीची माहिती

नाव –                                                                            हुद्दा –

विभाग/केंद्र –

मो क्रमांक                                                                     ईमेल –

प्रतिवादीची वादी शी  भूमिका  कोणती ?

५. घटनेचा तपशील

घटनेची तारीख –

घटनेचा तपशील –

घटनांची मालिका असल्यास तारीखवार तपशील

साक्षीदार असल्यास त्यांचे संपर्क तपशील

घटनेनंतर वादीने कुणा व्यक्तीस घटनेची माहिती दिली असल्यास त्यांचे संपर्क तपशील

ANNUAL REPORT 2023-24

Published on

कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी, पुणे

स्थापना: 21 डिसेंबर 1964

59 वा वार्षिक अहवाल

2023-24

नोंदणीकृत कार्यालय

270/बी, गोखलेनगर, पुणे 411016

दूरध्वनी: 020 25651588, 020 25673529

संकेतस्थळ: www.kamayani.org

ईमेल: kamayani.society@gmail.com

अनुक्रमणिका

वार्षिक सभेची सूचना3
संस्थेचे वार्षिक वृत्त4
सांख्यिकी15
व्यवस्थापन17
लेखापत्रके18
लेखा परीक्षण अहवाल 
आयव्यय व ताळेबंद 

कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी, पुणे

270/बी, गोखलेनगर, पुणे 411016

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

दि. 10/12/2024

महोदय/महोदया

स.न.वि.वि.

      कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा 27/15/2024 रोजी सायंकाळी 04.30 वा. “कामायनी”, 270/बी, गोखलेनगर, पुणे 411016 येथे होणार असून कामकाजाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

  1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे.
  2. सन 2023-24 चा अहवाल मंजूर करणे.
  3. सन 2023-24 चा अयव्यय व ताळेबंद मंजूर करणे.
  4. सन 2024-25 चे अंदाजपत्रक मंजूर करणे.
  5. मा. अध्यक्षांच्या अनुमतीने येणारे आयत्या वेळेचे विषय.

तरी आपण सभेस उपस्थित राहण्याचे करुन संस्थेवरील स्नेह कायम ठेवावा ही नम्र विनंती.

आपला विश्वासू

सुहास वसंत नगरे

कार्यवाह

संस्थेचे वार्षिक वृत्त

      उपक्रम

  • संस्थेची कार्यरत केंद्रे

गोखलेनगर, पुणे 411016.

  • कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डिकॅप्ड, शाळा.
  • कामायनी उदयोग केंद्र, कार्यशाळा.
  • संशोधन विभाग.
  • प. म. जोशी ग्रंथालय.
  • सांस्कृतिक सभागृह.

निगडी, पिंपरी चिंचवड 411044

  • कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डिकॅप्ड, शाळा.
  • कामायनी उदयोग केंद्र, कार्यशाळा.

तळेगांव दाभाडे, ता. मावळ, ‍जि. पुणे.

  • सिंधुताई जोशी उदयोग केंद्र, कार्यशाळा.
2.1 घटक संस्था
कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅडीकॅप्ड, गोखलेनगर, पुणे 411016
प्रमुख – श्रीमती सुजाता गुरुगोविंद आंबे
 दिव्यांग मार्गदर्शन केंद्र
दिव्यांग मार्गदर्शन केंद्रात 129 दिव्यांगाना मार्गदर्शन करण्यात आले.
बाल मार्गदर्शन केंद्र
बाल मार्गदर्शन केंद्रात 24 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
विशेष उल्लेखनीय घटना
माहे मार्च 2023 ते एप्रिल 2024 मध्ये आलेले राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी शासकीय नियमांचे पालन करुन कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत माहिती देऊन साजरे करण्यात आले.
जून 2023 पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. मुलांचे स्वागत शिक्षकांनी बँन्ड वाजवून, औक्षण, पुष्पवृष्टी करुन तसेच खाऊ देऊन करण्यात आले.
प्रत्येक गटाची पालक सभा घेण्यात आली. दिशा अभ्यासक्रमानुसार प्रत्येक पालकांना गृह उदिदष्ट देण्यात आले व शालेय उदिदष्टे सांगण्यात आले व चर्चा करण्यात आली.
दिनांक 21 जून 2023 आंतरराष्ट्रीय योगादिन मुलांसोबत साजरा करण्यात आला.
गणेशोत्सवामध्ये मुलांचे कार्यक्रम सादर करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
दि 07 व 08 नोहेंबर रोजी दिवाळी प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. अमिता देशमुख, मेट्रिक ग्लोबलच्या कार्यकारी संचालक यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावर्षी जून 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत महिन्यातील एका शनिवारी मुलांना वेताळ टेकडी चढण्यासाठी घेऊन जात होतो. मुलांना हा उपक्रम अतिशय आवडत होता.
01 ते 08 डिसेंबर “दिव्यांग सप्ताह” मुलांच्या विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला व मुलांना बक्षिसे देण्यात आली.
06 डिसेंबर 2023 रोजी, सहामाही मूल्यमापनावर पालक सभा घेण्यात आली. डॉ. अर्चना पाटील यांचे “आपल्या मुलांसाठी संतुलित आहार” या विषयावर पालकांसाठी व्याख्यान आयोजित केले होते.
दि 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 कामायनी संस्था आयोजित 35 व्या राष्ट्रीय मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. यावेळेस प्रथमच 18 वर्षाखालील आठ संघ सहभागी झाले होते व 18 वर्षावरील आठ संघ सहभागी झाले होते. उद्‌घाटन व बक्षिस समारंभ पण मोठ्या उत्साहात पार पाडला. प्रमुख पाहुणे मा. श्री शाम ओक माजी रणजी खेळाडू हे बसले होते.
20 जानेवारी 2024 रोजी शाळेच्या विदयार्थ्यासाठी ‘शेकोटी रजनी’ आयोजन करण्यात आली. 86 विदयार्थी रात्री शाळेत राहीले होते. उर्वरीत विदयार्थी रात्री 11 वाजता घरी गेले, सर्व मुलांना हा उपक्रम खूप आवडला.
मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन 22 फेब्रुवारी 2024 रोजी शाळेच्या मुनोत सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुण्या डॉ. प्रचिती सुरु कुलकर्णी (सिने, नाटय अभिनेत्री) या होत्या. याकार्यक्रमांवर आधारित पालकांसाठी प्रश्न मंजूषा घेण्यात आली. बरोबर उत्‍तरे असणाऱ्यांच्या उत्तराचा लकी ड्रॉ काढण्यात आला. श्रीमती कुडले व श्रीमती कांबळे अशा दोघींना बक्षिस मिळाले.
विदयार्थ्यांचे नेत्रदीपक यश
नृत्य व नाटय
बालकल्याण आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत (व्हिडिओ पाठवून व नंतर प्रत्यक्ष) कु तनिष आहेर याला व्दितीय क्रमांक मिळाला.
लायन्स क्लब आयोजित नृत्य स्पर्धेत दहा विद्यार्थी सहभागी झाले होते.
नवक्षितीज आयोजित नाटय स्पर्धेत पंधरा विद्यार्थी सहभागी झाले होते.
जीवनज्योत संस्था आयोजित नृत्य स्पर्धेत चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी शाळेला मिळाली.
निगडी शाळा आयोजित कविता व भक्तीगीत गायन स्पर्धेत कु. सर्वेश सुतार व पार्थ कारके या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
जीवनज्योत संस्था आयोजित खेळाच्या स्पर्धेत प्रथम व व्दितीय क्रमांकाची पाच बक्षिसे मुलांना मिळाली.
कामायनी प्रशिक्षण व संशोधन संस्था आयोजित 35 व्या मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धा.  18 वर्षाखालील गटाच्या स्पर्धेत कामायनी गोखलेनगर शाळेच्या संघाला व्द‍ितीय क्रमांकाची ट्रॉफी व रोख रक्कम 3000/- रु. बक्षिस मिळाले.
संस्कार प्रतिष्ठान केंद्र पिरंगुट आयोजित जिल्हा स्तरीय ग्रामीण व शहरी क्रीडा स्पर्धेत शाळेला उपविजेता ट्रॉफी मिळाली.
समाजकल्याण आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कु महम्मद शेख व कु समृद्धी मलगे यांना व्दितीय क्रमांकाची बक्षिसे मिळाली.
स्पेशल ऑलिम्पिक आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश जाधव याला बॅडमिंटन स्पर्धेत 4 था क्रमांक मिळाला.
नवक्षितीज आयोजित जिल्हास्तरीय पर्वती चढणे स्पर्शेत कु समृध्दी मलगे, कु सिध्दी चौधरी, कु यश जाधव, कु. आराध्या रसाळ यांना प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची पदके मिळाली.
बालकल्याण आयोजित मुलींच्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कु श्रुती शेटे हिला सुवर्ण पदक व कु समृद्धी मलगे हिला रौप्यपदक मिळाले.
कामायनी संस्था आयोजित मुलांच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेंत कु श्रुती शेटे ब्रॉझपदक, कु समृध्दी मलगे उत्तेजनार्थ व पुनर्वसन गटात मुस्कान शेख व रिया गुरव यांचा सहभाग होता. रिया गुरवला रौप्यपदक मिळाले.
07 सप्टेंबर 2024 रोजी शाडू मातीपासून श्रींची मूर्ती बनविणे कार्यशाळा मुलांसाठी घेण्यात आली. यामध्ये 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. मा.   श्री. उमेश वाघ यांनी मार्गदर्शन केले.
जागतिक दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
बालकल्याण, संस्था आयोजित “व्हेरी स्पेशल आर्ट” या स्पर्धेसाठी दिल्लीला चित्र पाठविली यामध्ये 22 विद्यार्थी सहभागी झाले होते.
रोटरी क्लब आयोजित चित्रकला स्पर्धेत 25 विदयार्थी सहभागी झाले होते.
सकाळ चित्रकला स्पर्धा
विभागीय पातळीवर उत्तेजनार्थ – पराग समेळ 250 रु.
केंद्र पातळीवर प्रथम क्रमांक   – पराग समेळ   100 रु.
व्दितीय क्रमांक – प्रणव खिस्ते    75 रु.
तृतीय क्रमांक  – विराज कदम    50 रु.
अशी बक्षिसे मिळाली
या वर्षातील महत्वाचे प्रकल्प व देणगी
BNY मेलॉन तर्फे 06 स्मार्ट बोर्ड शाळेला देणगी दाखल मिळाले.
BNY मेलॉन व मार्श मॅकलेनन कंपनी तर्फे CSR Activity शाळेत राबविण्यात आली.
सामाजिक कर्तव्य निधीमधून शाळेच्या वरील मजल्याचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.
पिक्टोग्राम प्रकल्प – तज्ञांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पिक्टोग्रामचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शाळेतील 4 शिक्षक सहभागी आहेत. श्रीमती कटके, श्रीमती बुक्के, श्रीमती गेंगजे, श्रीमती कवडे.
दि. 05.12.2024 रोजी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, नऱ्हे आंबेगांव, पुणे यांचेतर्फे 109 विदयार्थ्यांचे जनरल तपासणी करुन ज्या विदयार्थ्यांना समस्या होत्या त्या विदयार्थ्यांना पालकांसोबत हॉस्पिटल पाठवून उपचार करण्यात आले.
दि. 17.02.2024 रोजी डॉ होमी भाभा आरोग्य दवाखाना, गोखलेनगर, पुणे यांचेतर्फे 125 विदयार्थ्यांचे आरोग्य तपासणी करुन त्यांना जंतनाशक गोळया देण्यात आले.
2.2 कामायनी उदयोग केंद्र, गोखलेनगर, पुणे 411016
    प्रमुख – श्री विजय मुकूंद टोपे
कार्यशाळेत १८ वर्षावरील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण गेली ४४ वर्षे दिले जात आहे. विद्यार्थ्यांची आवड, शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन त्यांना निरनिराळ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.
कार्यशाळेत कागद विच्छेदन यंत्र असून पुणे शहरातील विविध हॉस्पिटल, महाविद्यालये, कंपन्या इत्यादींकडून छेदनासाठी कागद मोफत दिला जातो. तो कागद विच्छेदित करून त्याचा पॅकिंगसाठी व पुनर्वापरासाठी विविध कंपनीत पाठविला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले काम मिळते. हातमाग व यंत्रमागावर कापड विणणे, शिवणकाम, पुस्तक बांधणी व विविध प्रकारचे जॉबवर्कची कामे केली जातात. यावर्षी रुबी हॉल हॉस्पिटलची रजिस्टर तयार करण्याचे नवीन ऑर्डर मिळाली आहे. यात मुलांचा सहभाग असतो.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे भव्य दिवाळी प्रदर्शन संस्थेच्या कामायनी सभागृहात आयोजित केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी निदेशकांच्या मदतीने तयार केलेल्या विविध वस्तू ठेवल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने आकर्षक व पर्यावरणपूरक आकाश कंदील, पणती, फुलदाणी इ. वस्तू तसेच सुवासिक उटणे, हातमाग व यंत्रमागावर तयार केलेले आकर्षक किचन नॅपकिन्स, टॉवेल्स, बेडशीटस्, पिशव्या, डस्टर्स, कापडी मोबाईल पाऊच, पर्सेस, हॅण्डबॅग, रांगोळी, रांगोळीचे रंग, आकर्षक ग्रिटींगकार्डस् इ. तयार केले जातात. तसेच रंगीत, पांढरी पाकिटे, हातकागदापासून तयार केलेल्या पिशव्या, रजिस्टर, पॅड, मेणबत्या व दिवाळी मेणपणत्या, तसेच हार, तोरण, तयार करून प्रदर्शनात मांडल्या जातात.  
विशेष उल्लेखनीय घटना
दि 15 जून कार्यशाळा सुरू, विद्यार्थ्यांचे स्वागत
दि 26 जून कार्यकारी विश्वस्त मा. श्रीमती श्रीलेखाताई कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा
दि 18 जुलै कामायनी संस्थेच्या संस्थापिका कै. सिंधुताई जोशी यांचा स्मृतीदिन साजरा
दि 02 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी, कै. अण्णाभाऊ साठे जयंती
दि 09 ऑगस्ट कामायनी निगडी येथे सुगम संगीत स्पर्धा
दि 15 ऑगस्ट भारत देशाचा 76 वा स्वातंत्र दिन साजरा.
दि 24 ऑगस्ट शिवण ब गटाची पालक सभा
दि 28 ऑगस्ट मा. श्री. सुपाते सर यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ. श्री. विजय टोपे सर यांचे स्वागत.
दि 06 सप्टेंबर पर्यावरण पूरक श्री गणेश मुर्ती बनविणे कार्यशाळा.
दि 28 सप्टेंबर श्री कसबा गणपती विसर्जन मिरवणूकीत मुलांचा बॅण्ड पथक सहभाग
दि 29 सप्टेंबर संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. अरविंद कुलकर्णी सर यांचा वाढदिवस
दि 02 ऑक्टोबर कै. सिंधूताई जोशी जन्मदिन, महात्मा गांधी जयंती.
दि 23 ऑक्टोबर खंडे नवमी यंत्रपूजा
दि 07 नोव्हेंबर दिवाळी प्रदर्शन, पालक मेळावा
दि 01 डिसेंबर दिव्यांग सप्ताह समारंभ
दि 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन. बालकल्याण येथे विदयार्थ्यांचा सहभाग.
दि 21 डिसेंबर संस्थेचा वर्धापन दिन साजरा
दि 03 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती.
दि 10 ते 12 जानेवारी क्रिकेट स्पर्धा या दोन गटात आयोजित करण्यात आल्या. 18 वर्षाखालील शाळा गट 8 संघ, 18 वर्षावरील कार्यशाळा गट 8 संघ कै. प. म. जोशी खटाव मिल्स मुंबई स्मृति करंडक व के. ए. लाहोरी स्मृति करंडक स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले होते.
दि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा.
दिनांक 28 जानेवारी ते 02 फेब्रुवारी या कालावधीत गायत्री संदेवाड, गणेश सुलाखे, प्रसन्ना हाडके स्पेशल ऑलिंम्पिक भारत स्पर्धेसाठी नागपूर येथे गेले होते.
दि 06 फेब्रुवारी समाज कल्याण आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग कार्यशाळेस सर्वसाधारण विजेते ट्रॉफी मिळाली.
दि 22 फेब्रुवारी वार्षिक स्नेहसंम्मेलन
दि 16 मार्च बी.एन. वाय. मेलॉन/स्वयंसेवकांचा विद्यार्थ्यां बरोबर सहभाग
2.3 कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅडीकॅप्ड, निगडी, पुणे 411044
प्रमुख – श्रीमती शुभांगी सतिश शहा
बालमार्गदर्शन केंद्र.   
बालमार्गदर्शन केंद्रात 17 विदयार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मानसोपचार तज्ञ डॉ. प्रिया गायकवाड आणि मानद वैदयकीय अधिकारी डॉ. रणजितसिंह माने यांच्याकडून मुलांची नियमित तपासणी होत असते.
दिव्यांग मार्गदर्शन केंद्र.
दिव्यांग मार्गदर्शन केंद्रात पिंपरी चिंचवड परिसरातील 55 ते 60 पालकांना सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विदयार्थ्यांना पिंपरी चिंचवड म. न. पा. तर्फे दरवर्षी शिष्यवृत्‍ती देण्यात येत आहे.
विशेष उल्लेखनीय घटना
15 जून 2023 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. ज्यावेळी विदयार्थ्यांचे स्वागत औक्षण, बॅन्ड वाजवून करण्यात आले.
माहे मार्च 2023 ते एप्रिल 2024 मध्ये सर्व राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये माहिती देऊन आनंदाने साजरे करण्यात आले.
सर्व शिक्षकांचे दिशा अभ्यासक्रमाप्रमाणे कामकाज सुरु आहे.
21 जून 2023 रोज ‘आंतर राष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.
09 ते 10 ऑगस्ट 2023 रोजी आदरणीय कै. सिंधूताई जोशी यांच्या स्मरणार्थ ‘दिव्यांग मुलांच्या सुगम संगीत स्पर्धा’ आयोजित करण्यात आली. विविध गटात मिळून एकूण 53 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.
26 ऑगस्ट 2023 रोजी ‘वर्षासहल’ आयोजित करण्यात आली. सहलीचा सर्वांनी आनंद लुटला.
गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी विविध स्पर्धां आयोजित करण्यात आल्या.
10 ऑक्टोबर 2023 ‘वर्ग सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली. याचे परीक्षण मा. श्रीमती सुलभा बारवकर यांनी केले.
दि.07.11.2023 रोजी शाळेत दिवाळी प्रदर्शन भरविण्यात आले. प्रसिध्द उद्योगपती    मा. श्री. पप्पु गुप्ता यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
30 नोव्हेंबर 2023 रोजी इनरव्हील क्लब तर्फे ‘दंत चिकित्सा शिबीर’ घेण्यात आले.
01 ते 08 डिसेंबर 2023 दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थीसाठी मनोरंजन, सहल व पालकांसाठी व्याख्याने आयोजित केली होती.
11 व 12 डिसेंबर 2023 रोजी लोकमान्य हॉस्पिटल, निगडी यांचेमार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
22 ‍डिसेंबर 2023 रोजी स्नेहमीलन यात्रेचे आयोजिन करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. श्री. संदीप वनवारी उपस्थ‍ित होते. दिव्यांग विद्यार्थ्यांबरोबर साधारण विद्यार्थी माहिती फलक घेऊन कामायनी स्कूल- काचघर चौक- भेळ चौक- संभाजी चौक– म्हाळसाकांत चौक- लोकमान्य हॉस्पिटल- सावली हॉटेल – कामायनी स्कूल मार्गावरुन प्रभात फेरी काढली. यात 7 शाळा सहभागी होत्या.
22 ते 24 जानेवारी 2024 रोजी’ जल्लोष शिक्षणाचा ‘कार्यक्रमात सहभाग.
13 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा ब्ल्यू स्कोप स्टील कंपनीचे 19 सदस्यांनी विद्यार्थ्यांकडून विविध कृती करुन घेतल्या. त्यात फनी गेम्समध्ये बोलिंग व रिंग टाकणे आणि होमसायन्समध्ये सॅन्डविच तयार करणे या कृतींचा समावेश होता.
28 फेब्रुवारी 2024 रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कै. रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडले. यावेळी शाळा, कार्यशाळा व तळेगाव केंद्राच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केला.  यावेळी श्री. श्रीनिवास दांगट, सहाय्यक आयुक्त, ‍दिव्यांग विभाग, पिंपरी चिंचवड, म. न. पा. व श्रीमती ईशा आगरवाल, प्रसिध्द अभिनेत्री उपस्थित होते. आदर्श पालक :- श्री. संजय चोबे(शाळा), श्री. शालीग्राम वाघ (कार्यशाळा).आदर्श विद्यार्थी :- चि. प्रज्वल चोबे (शाळा), चि. हेमंत वाघ (कार्यशाळा)
मा. प्राचार्या शहा मावशी शरीर साक्षरता या विषयी प्रात्यक्षिक व दृकश्राव्य पध्दतीने शिक्षण देत आहेत. त्याचा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.
विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
पिरंगुट येथे शालेयअंतर्गत जिल्हास्तरीय विविध खेळांच्या स्पर्धा विजेते पदाची ट्रॉफी निगडी शाळेस मिळाली.
नागपूर येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत कु. सुमेधा सोनवने प्रथम क्रमांक मिळाला.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी कु. सुमेधा सोनवने गेली होती. तिला ब्राँझ पदक मिळाले होते.
‍दिव्यांग शाळांच्या जिल्हास्तरीय विविध खेळांच्या स्पर्धा सणस क्रीडांगण, सारसबाग, पुणे येथे दि. 06.02.2024 रोजी झाल्या. त्यात निगडी शाळेस विजेते पदाची ट्रॉफी मिळाली.
शाहू  क्रीडांगण पिंपरी  चिंचवड महानगरपालिका व साई संस्कार यांचेतर्फे विविध खेळांच्या स्पर्धा विजेते पदाची ट्रॉफी मिळाली.  म्युझिक  सिस्टीम, मुलांना रोख स्वरुपात बक्षिसे मिळाली.
दिलासा यांनी घेतलेल्या नृत्य स्पर्धेत शाळेला उत्तेजनार्थ बक्षिस ‍मिळाले.
बालकल्याण संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वाद्य वादन स्पर्धेत ढोलकी वादन यात हर्षद कांबळे या ‍विद्यार्थ्यांस प्रथम क्रमांक मिळाला.
पिक्टोग्राम प्रकल्प- तज्ञांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पिक्टोग्रामचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. शाळेतील 4 शिक्षक सहभागी आहेत. श्रीमती फुलसुंदर, श्रीमती शेवते, श्रीमती बाविस्कर श्रीमती फापाळे
या वर्षातील महत्वाचे प्रकल्प व देणगी
बी. एन. वाय. मेलन यांच्याकडून सात स्मार्ट बोर्ड मिळाले.
मा. श्री. संदीप वनवारी यांचेकडून 51,000/- रुपये देणगी मिळाले.
मा.श्री. विजय कोलटकर यांचेकडून 20,001/- रुपये देणगी मिळाले.
S V TECH ENGG CONSULTANTS PVT LTD. यांचेकडून 11,000/- रुपये देणगी मिळाले.
मा. श्री. दिलीप गंगाधर जोशी यांचेकडून 10,000/- रुपये देणगी मिळाले.
Lions Club of Pune यांचेकडून 5,000/- रुपये देणगी मिळाले.
मा. श्रीमती कुसुम सुरेशचंद्र भगोदिया यांचेकडून 5,000/- रुपये देणगी मिळाले.
2.4 कामायनीचे सिंधुताई जोशी उदयोग केंद्र, तळेगांव दाभाडे, पुणे
प्रमुख – श्री. दिपक सोनवणे
मावळ परिसरातील गरज ओळखून प्रौढ मतिमंदां साठी कामायनी प्रशिक्षण संशोधन सोसायटी पुणे संचलित सिंधुताई जोशी उद्योग केंद्र जुना मुंबई – पुणे महामार्ग वर तळेगाव दाभाडे लिंब फाटा येथे दोन एकर जागेत दि ११ मे २०१६ रोजी सुरु करण्यात आलेले आहे, सदर केंद्रात तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, आंबी, वराळे, चाकण रोड, धामणे, सोमाटणे फाटा, देहूरोड, किवळे, चिंचोली, विकास नगर, माळवाडी, रावेत, थॉमस कॉलनी, साई नगर गहुंजे या परिसरातील एकूण पटावर ३० प्रशिक्षणार्थी असून पुरुष २४ व महिला ६, आहेत. प्रशिक्षणार्थींच्या पुनर्वसन व भविष्यच्या दृष्टीने कागदी पिशव्या, कृत्रिम फुले, आंबा, फळ झाडांना पाणी देणे, बाग स्वच्छ करणे, पेपर श्रेडिंग (कागदी कात्रणे), मातीच्या पणत्या रंगवणे, मण्याच्या माळा, रंगसंगतीच्या बाटल्या बनवणे, इ. कामे प्रशिक्षणार्थी करतात.
विशेष उल्लेखनीय घटना
गुढीपाडवा मंगळवार दिनांक 21.03. 2023 रोजी गुढीपाडव्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
हाफ पीच क्रिकेट स्पर्धा:- शनिवार दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी,  स्पर्धेत मध्ये मवाळ , पिंपरी चिंचवड, येथील ब्रह्मदत्त शाळा, कामायनी शाळा, कामायनी कार्यशाळा, कामायनी उद्योग केंद्र, तळेगाव इत्यादी शाळा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन मा. श्री. आशुतोष इ. प्र. भुपटकर, तसेच GKN कंपनी चाकण श्रीमती चैत्राली पाटेकर   श्री अभिषेक नारकर तसेच कंपनीचे सहकारी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभा नंतर सर्व स्पर्धकांची मैदानावर प्रभात फेरी करण्यात आली. स्पर्धेमध्ये दुपारचे भोजन सुशीला मंगल कार्यालयाचे संचालक श्री संतोष परदेशी यांच्याकडून देण्यात आले. पंच म्हणून क्रीडा शिक्षक      श्री अशोक नांगरे श्री रवींद्र जोशी व श्री प्रशांत गडदे यांनी कार्यभार सांभाळला. बक्षीस वितरण समारंभ रोटरी क्लब ऑफ मावळ, रोटरी क्लब ऑफ सिटी तळेगाव दाभाडे, यांचे अधिकारी मा. श्री.  दीपक चव्हाण, मा. श्री. मनोज ढमाले, मा. श्री. दादासाहेब उऱ्हे, उपस्थितीत विजेत्या संघाल बक्षीस देण्यात आले.
वर्धापन दिन:- मंगळवार, दिनांक २ मे २०२२ रोजी वर्धापन दिन, सर्व प्रशिक्षणार्थीच्या उपस्थितीत खाऊ वाटप करून संपन्न झाला.
आंतरराष्ट्रीय योग दिन:- बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन   करण्यात आले होते. या योगा दिनानिमित्त तळेगाव येथील ओरॅकल फिटनेस जिम येथील प्रशिक्षक राहुल शिंदे हे उपस्थित होते.
आषाढी कार्तिकी दिंडी सोहळा:- २७ जून २०२३ रोजी उद्योग केंद्रामध्ये आषाढी कार्तिकी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सौ शुभदा नाखरे तसेच स्नेहल वारसवडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी व प्रमुख पाहुणे व शिक्षक इतर कर्मचारी सर्वांनी संस्थेच्या आवारात पायी दिंडी काढण्यात आली व पसायदानाने कार्यक्रमाचे सांगाता झाली.
गुरुपौर्णिमा:- ३ जुलै २०२३ रोजी उद्योग केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संतोष खारे गुरुजी हे मान्यवर उपस्थित होते. त्यांचे स्वागत संस्थेचे लेखापाल प्रसाद करमरकर यांनी केले. प्रशिक्षणार्थींमधील शिवराज गराडे यांने गुरुजींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर संस्थेच्या सहाय्यक शिक्षिका स्नेहल दिघे यांनी मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
सुगम संगीत स्पर्धा:- 3 ऑगस्ट 2023 रोजी सुगम संगीत स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता ही स्पर्धा कामायनी विद्या मंदिर निगडी शाखेत आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये संस्थेतील शिवराज गराडे आणि संस्कृती शर्मा ह्यांनी सहभाग घेतला होता.
स्वातंत्र्य दिन:- १५ ऑगस्ट २०२३ रोजी, स्वातंत्र्य दिना निमित्त विघ्नहर्ता हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. मा. श्रीमती राणी बच्चे, डी, व्हा. पाटील कॉलेज प्रोफेसर. मा. श्री. पाटील संस्थेचे चेअरमन मा. श्री. आशुतोष इ. प्र. भुपटकर, यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थींना खाऊ वाटप करून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव:- 31 ऑगस्ट 2023 रोजी उद्योग केंद्रामध्ये चित्तोर  यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांचे अध्यक्ष, सदस्य यांची उपस्थिती होती.चित्तोर सरांच्या जन्मदिवसानिमित्त रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांनी पोडियम स्टँड( Podium Stand) संस्थेस देणगी केला.
गोकुळाष्टमी:- ७ सप्टेंबर २०२३ रोजी उद्योग केंद्रामध्ये गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सर्व प्रशिक्षणार्थींनी दहीहंडी फोडली व विविध नृत्य सादर केले.
दीपावली खाऊ वाटप:- ९ नोव्हेंबर २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ ट्रस्ट तळेगाव दाभाडे यांच्या सदस्य उपस्थित राहून त्यांनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सर्व प्रशिक्षणार्थींना खाऊ वाटप करण्यात आला. ट्रस्ट मधील श्रीमती सोनवणे ताई या उपस्थित होत्या.
राष्ट्पिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती, संस्थपिका, श्रीमती. सिंधुताई जोशी जयंती:- ३ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, तसेच कामायनी च्या संस्थपिका, श्रीमती. सिंधुताई जोशी जयंती, निमित्त प्रशिक्षणार्थीना फळ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. 
रास दांडिया:- २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी उद्योग केंद्र मध्ये भोंडला आणि रास दांडिया कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय तपासणी:- ३० नोव्हेंबर २०२३ रोजी इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, यांच्यामार्फत सर्व प्रशिक्षणार्थींची आरोग्य तपासणी करण्यात आली, या तपासणीसाठी इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या अध्यक्ष संध्या थोरात त्याचप्रमाणे सेक्रेटरी निशा पवार इत्यादी, उपस्थित होते, वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टर दिपाली जवर व डॉक्टर राणी बच्चे उपस्थित होते वैद्यकीय तपासणी साठी १७ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
गायन कार्यक्रम:- 02 डिसेंबर 2023 रोजी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे सिंधुताई जोशी उद्योग केंद्र तळेगाव दाभाडे येथे मनोरंजनाच्या दृष्टीने प्रशिक्षणार्थींसाठी गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी क्लबचे प्रेसिडेंट श्रीमती संध्या थोरात सेक्रेटरी श्रीमती निशा पवार श्रीमती कृपा नागपाल श्रीमती पल्लवी तापस व श्री समीर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. श्री समीर महाजन यांनी गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन हे दिव्यांग सप्ताह असल्याकारणाने प्रशिक्षणार्थींच्या मनोरंजनाच्या हेतूने ठेवला होता.
विनो ग्लोबल वुमन वेल्फेअर ऑर्ग ट्रस्ट – १३ डिसेंबर २०२३ रोजी विना ग्लोबल वुमन वॉल्फेरे ऑर्ग ट्रस्ट तळेगांव दाभाडे या क्लबच्या महिला उपस्थित होत्या या क्लब तर्फे सर्व प्रशिक्षणार्थींना दुपारचे स्नेहभोजन  देण्यात आले,  तसेच विना ग्लोबल वुमन वॉल्फेरे ऑर्ग अध्यक्ष श्रीमती सपना शहा यांनी त्यांच्या संस्थेविषयी माहिती सांगितली त्याचप्रमाणे शितल शहा, हेमा शहा, मोहिनी राठोड, वर्षा उस्वाल आणि मीना पाठवा यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आपल्या प्रशिक्षणार्थींसाठी वैद्यकीय मेडिकल किट संस्थेला भेट दिली.
सहल श्री क्षेत्र भंडारा डोंगर:- 20 डिसेंबर 2023 रोजी सर्व प्रशिक्षणार्थीं साठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते या सहलीसाठी सर्व प्रशिक्षणार्थींना श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे घेऊन जाण्यात आले होते.  त्यानंतर मूर्तीचे दर्शन घेऊन सर्व प्रशिक्षणार्थींना दुपारचे जेवणाची व्यवस्था श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट यांनी केली होती.
स्नेह यात्रा:- २२ डिसेंबर २०२३ रोजी कामायनी शाखेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त कामायनी विद्यामंदिर निगडी येथे स्नेह यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव उद्योग केंद्रातून २० प्रशिक्षणार्थींनी स्नेह यात्रेमध्ये सहभाग घेतला होता.
शैक्षणिक सहल:- 30 जानेवारी रोजी ही शैक्षणिक सहल “आरडी ऑरगॅनिक अग्री टुरिझम “येथे नेण्यात आली होती, 25 प्रशिक्षणार्थी या सहली मध्ये सहभागी झाले होते. तेथे सर्व प्रशिक्षणार्थींनी ग्रीन हाऊस या विषयी माहिती मिळवली व तेथील उपकरणांची माहिती तेथील माननीय श्री संजय लकाडे यांनी प्रशिक्षणार्थींना दिली. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी तेथील फळबागांची पाहणी केली, सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी दुपारचे जेवण करून संस्थेत सुमारे साडेतीन वाजता पोहोचले.
संशोधन विभाग गोखलेनगर (संशोधक: डॉ. आशा देशपांडे)
गेली दोन वर्षे फ्रान्स मधील पिक्टो च्या सहकार्याने आपण चित्र मालिकेच्या सहाययाने आपले विदयार्थी अधिक स्वायत्तपणे काम करु शकतात का या प्रकल्पावर संशोधनकार्य करीत आहोत. यात गोखलेनगर आणि निगडी येथील 11 शिक्षक व निदेशक यांनी भाग घेतला होता. त्यात प्रथम त्यांनी विदयार्थी व त्यांना शिकवायची कामे यांची निवड केली, कामांची उदाहरणे म्हणजे कपडयांची घेडी घालणे, वेणी घालणे, काकडीची कोशिंबीर करणे यासारखी कामे घेतली. त्यानंतर प्रत्येक कामाची चित्रमालिका तयार करण्यात आली. पहिली मालिका विदयार्थ्यांना सोपीन गेल्याने त्यात सुधारणा करण्यात आली. नंतर मुलांना या कामाची कितपत माहिती मुळात आहे याची चाचणी घेऊन निरीक्षणे नोंदविण्यात आली. त्यानंतर प्रायोगिक गटातील मुलांना चित्रमालिकेव्दारे काम शिकविण्‍यात आले. तर नियंत्रित गटातील मुलांना तोंडी सूचना देऊन चित्राशिवाय तेच काम शिकविण्यात आले. दोन्ही गटातील मुले किती प्रमाणात काम शिकली आहेत आणि प्रायोगिक गटातील मुले किती प्रमाणात चित्रे ओळखतात याबददल निरीक्षणे करण्यात आली. सुरवातीचे मुलांचे ज्ञान आणि शिकविल्यानंतर ज्ञान आणि कौशल्य यात काही वाढ होते का आणि चित्रमालिकेच्या योगाने मुले अधिक स्वायत्त होऊ शकतात का हे तपासण्याचा हा प्रकल्प आहे.
या प्रकल्पात सर्वश्रीम कटके, बुक्के, कवडे, गेंगजे, नांगरे, सोनावले, फुलसुंदर, बाविस्कर, फापाळे, शेवते व श्री कृष्णा काळे यांनी भाग घेतला आहे. चित्रे काढण्यात श्री प्रवीण फडणीस आणि श्री दिलीप वंजारी यांनी मोलाचे साहाये केले आहे.
आगामी वर्षात आधी झालेल्या संशोधनावर आधारित मराठी पुस्तिका करणे तसेच कृतिसत्रे घेऊन ते संशोधन पालकांपर्यंत पोचवावे असा प्रयत्न राहणार आहे.
प. म. जोशी ग्रंथालय डिजिटल लायब्ररी, गोखलेनगर
ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह 5000 च्या वर असून ते सर्व नागरिकांसाठी नाममात्र शुल्कावर उपलब्ध आहे.
ग्रंथालयाची सभासद संख्या 250 पेक्षा अधिक आहे. परंतु नव्या तंत्रज्ञानामुळे पुस्तके आंतरजालावर उपलब्ध असल्याने ग्रंथालयाचा वापर कमी होत आहे.
प्रदीप मोघे
कोषाध्यक्ष
सुहास नगरे
कार्यवाह
श्रीलेखा कुलकर्णी उपाध्यक्षआशुतोष भुपटकर
अध्यक्ष
सांख्यिकी
विदयार्थी संख्या
केंद्रवर्षारंभनवीन प्रवेशसोडून गेलेवर्ष अखेर
शाळा, गोखलेनगर1252424125
कार्यशाळा, गोखलेनगर1041315102
प्रौढगट, गोखलेनगर26000125
शाळा, निगडी1001515100
शाळा, निगडी (पटाव्यतिरिक्त)24020719
कार्यशाळा, निगडी61030361
कार्यशाळा, तळेगांव33041225
कर्मचारी संख्या (मंजूर) नियुक्त
  व्यवस्थापन व शैक्षणिककार्यालयीनसेवक वर्ग
शाळा, गोखलेनगर(21) 16(04) 02(16) 08
कार्यशाळा, गोखलेनगर(07) 05(02) 02(05) 04
शाळा, निगडी(14) 04(02) 00(02) 02
शाळा, गोखलेनगर मानद000204
कार्यशाळा, गोखलेनगर मानद030001
शाळा, निगडी मानद040000
कार्यशाळा, निगडी मानद020102
कार्यशाळा, तळेगांव मानद020104
देणग्या नेहमीप्रमाणे यंदाही देणगीदारांचा उदार आश्रय संस्थेला लाभला. त्यापैकी काही देण्याग्यांचा उल्लेख येथे आवश्यक आहे.
देणगीदाराचे नांवरक्कम रुपये
बजाज फायनान्स लि.3,59,90,000/-
मार्श मॅकलेनन ग्लोबल सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि.31,00,000/-
मॅचिंग ग्रॅन्ड फ्रॉम बी एन वाय मेलॉन18,00,000/-
अस्मिती मेडिकल फौंडेशन ऍ़ड रिसर्च सेंटर10,00,000/-
श्री अभिजीत अरविंद कुलकर्णी10,00,000/-
आरआयजे इंजिनीअरींग प्रा. लि.10,00,000/-
ज्ञानक ऍ़टोमोटिव्ह स्टँपिंग प्रा. लि.9,85,260/-
टाटा ब्लू स्कोप स्टिल प्रा. लि.4,00,000/-
हिरा सॉप्‍टवेअर प्रा. लि.2,75,000/-
अर्जुन वाडकर फौंडेशन2,50,000/-
रमनानी अय्यंगार चॅरिटेबल ट्रस्ट1,00,000/-
श्री अजित लेले1,00,000/-
श्री अमित तेली1,00,000/-
श्रीमती विनीता काने1,00,000/-
वस्तूरुप देणगी  —  कॅनरा बँक कडून दोन कपाटे
आभार
खालील वैदयकीय तज्ञांनी संस्थेच्या विदयार्थ्यांना वैदयकीय सेवा मानद रुपात दिली त्याबददल त्यांचे संस्थेतर्फे मन:पूर्वक आभार
गोखलेनगर विभाग
डॉ. जयदीप पाटील,मानसोपचार तज्ञ
निगडी विभाग
डॉ. प्रिया गायकवाड,मानसोपचार तज्ञ
डॉ. रणजितसिंह माने,मानद वैदयकीय अधिकारी
पालक प्रतिनिधींनी स्थानिक व्यवस्थापन समित्यांवर प्रतिनिधित्व केले.
गोखलेनगर विभाग
शाळाश्रीमती सुलभा गायकवाड
कार्यशाळाश्रीमती माधवी पवार
निगडी विभाग
शाळाश्रीमती मंगल गारोळे
कार्यशाळाश्री प्रसाद कापसे
व्यवस्थापन
विश्वस्त मंडळ:-
श्रीलेखा कुलकर्णी
कार्यकारी विश्वस्त
डॉ. अरविंद कुलकर्णी
विश्वस्त
डॉ. आशुतोष भुपटकर
विश्वस्त
संस्था अध्यक्ष     डॉ. अरविंद कुलकर्णी

कार्यकारिणी       (01 एप्रिल 2023- 31 मार्च 2025)

अध्यक्ष           डॉ. आशुतोष भुपटकर
उपाध्यक्ष          श्रीलेखा कुलकर्णी
कार्यवाह           अॅड सुहास नगरे
खजिनदार          प्रदीप मोघे
सहकार्यवाह         अशोक कुलकर्णी
सदस्य             उत्तरा पंडित
सदस्य             सुप्रभा सावंत (दि. 05.11.2023 पर्यंत)
सदस्य             डॉ. जान्हवी थत्ते
सदस्य             डॉ. आशा देशपांडे
सदस्य             जावेद इनामदार
सदस्य             अॅड. दीपा खरे
सदस्य             कलिका मुजुमदार

Musical Memories

Published on

The year was 1991.  Our student, Jeevan Parkhe was chosen to represent India at the Special Olympics Summer Games that were to be held in US.  Jeevan was to compete in Swimming events.  This was the first time a Kamayani student was to take part in an International sports event.  Athletes’  travel and stay was to be funded by their respective institutions.

While staff and students were enthused by this selection, our founder Sindhutai Joshi was anxious about arranging a sum of Rs 25,000 that would be necessary for Jeevan’s travel and stay.  Smt Leelatai Bhagwat was the Secretary of Kamayani Society.  She knew the famous music director, Pandit Hridaynath Mangeshkar, the younger brother of the legendary Lata Mangeshkar.  It was decided to approach him, since he used to stage a very popular programme of Light Music, Bhav Sargam.  

Panditji readily agreed to stage a programme and donate the proceeds toward Jeevan’s Special Olympics participation.  Accordingly a performance of Bhav Sargam was organized in the Tilak Smarak Mandir at Pune.  The proceeds of Rs 25000 were handed over by Pt Hridaynath Mangeshkar to Kamayani. 

Jeevan Parkhe took part in the Special Olympics and returned with two silver medals.

After completing his training in Kamayani, Jeevan’s first job was in a security agency and later atan Automobile Service Station.