ANNUAL REPORT 2023-24

Published on

कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी, पुणे

स्थापना: 21 डिसेंबर 1964

59 वा वार्षिक अहवाल

2023-24

नोंदणीकृत कार्यालय

270/बी, गोखलेनगर, पुणे 411016

दूरध्वनी: 020 25651588, 020 25673529

संकेतस्थळ: www.kamayani.org

ईमेल: kamayani.society@gmail.com

अनुक्रमणिका

वार्षिक सभेची सूचना3
संस्थेचे वार्षिक वृत्त4
सांख्यिकी15
व्यवस्थापन17
लेखापत्रके18
लेखा परीक्षण अहवाल 
आयव्यय व ताळेबंद 

कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी, पुणे

270/बी, गोखलेनगर, पुणे 411016

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

दि. 10/12/2024

महोदय/महोदया

स.न.वि.वि.

      कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा 27/15/2024 रोजी सायंकाळी 04.30 वा. “कामायनी”, 270/बी, गोखलेनगर, पुणे 411016 येथे होणार असून कामकाजाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

  1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे.
  2. सन 2023-24 चा अहवाल मंजूर करणे.
  3. सन 2023-24 चा अयव्यय व ताळेबंद मंजूर करणे.
  4. सन 2024-25 चे अंदाजपत्रक मंजूर करणे.
  5. मा. अध्यक्षांच्या अनुमतीने येणारे आयत्या वेळेचे विषय.

तरी आपण सभेस उपस्थित राहण्याचे करुन संस्थेवरील स्नेह कायम ठेवावा ही नम्र विनंती.

आपला विश्वासू

सुहास वसंत नगरे

कार्यवाह

संस्थेचे वार्षिक वृत्त

      उपक्रम

  • संस्थेची कार्यरत केंद्रे

गोखलेनगर, पुणे 411016.

  • कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डिकॅप्ड, शाळा.
  • कामायनी उदयोग केंद्र, कार्यशाळा.
  • संशोधन विभाग.
  • प. म. जोशी ग्रंथालय.
  • सांस्कृतिक सभागृह.

निगडी, पिंपरी चिंचवड 411044

  • कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅण्डिकॅप्ड, शाळा.
  • कामायनी उदयोग केंद्र, कार्यशाळा.

तळेगांव दाभाडे, ता. मावळ, ‍जि. पुणे.

  • सिंधुताई जोशी उदयोग केंद्र, कार्यशाळा.
2.1 घटक संस्था
कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅडीकॅप्ड, गोखलेनगर, पुणे 411016
प्रमुख – श्रीमती सुजाता गुरुगोविंद आंबे
 दिव्यांग मार्गदर्शन केंद्र
दिव्यांग मार्गदर्शन केंद्रात 129 दिव्यांगाना मार्गदर्शन करण्यात आले.
बाल मार्गदर्शन केंद्र
बाल मार्गदर्शन केंद्रात 24 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
विशेष उल्लेखनीय घटना
माहे मार्च 2023 ते एप्रिल 2024 मध्ये आलेले राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी शासकीय नियमांचे पालन करुन कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत माहिती देऊन साजरे करण्यात आले.
जून 2023 पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. मुलांचे स्वागत शिक्षकांनी बँन्ड वाजवून, औक्षण, पुष्पवृष्टी करुन तसेच खाऊ देऊन करण्यात आले.
प्रत्येक गटाची पालक सभा घेण्यात आली. दिशा अभ्यासक्रमानुसार प्रत्येक पालकांना गृह उदिदष्ट देण्यात आले व शालेय उदिदष्टे सांगण्यात आले व चर्चा करण्यात आली.
दिनांक 21 जून 2023 आंतरराष्ट्रीय योगादिन मुलांसोबत साजरा करण्यात आला.
गणेशोत्सवामध्ये मुलांचे कार्यक्रम सादर करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
दि 07 व 08 नोहेंबर रोजी दिवाळी प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. अमिता देशमुख, मेट्रिक ग्लोबलच्या कार्यकारी संचालक यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावर्षी जून 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत महिन्यातील एका शनिवारी मुलांना वेताळ टेकडी चढण्यासाठी घेऊन जात होतो. मुलांना हा उपक्रम अतिशय आवडत होता.
01 ते 08 डिसेंबर “दिव्यांग सप्ताह” मुलांच्या विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला व मुलांना बक्षिसे देण्यात आली.
06 डिसेंबर 2023 रोजी, सहामाही मूल्यमापनावर पालक सभा घेण्यात आली. डॉ. अर्चना पाटील यांचे “आपल्या मुलांसाठी संतुलित आहार” या विषयावर पालकांसाठी व्याख्यान आयोजित केले होते.
दि 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 कामायनी संस्था आयोजित 35 व्या राष्ट्रीय मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. यावेळेस प्रथमच 18 वर्षाखालील आठ संघ सहभागी झाले होते व 18 वर्षावरील आठ संघ सहभागी झाले होते. उद्‌घाटन व बक्षिस समारंभ पण मोठ्या उत्साहात पार पाडला. प्रमुख पाहुणे मा. श्री शाम ओक माजी रणजी खेळाडू हे बसले होते.
20 जानेवारी 2024 रोजी शाळेच्या विदयार्थ्यासाठी ‘शेकोटी रजनी’ आयोजन करण्यात आली. 86 विदयार्थी रात्री शाळेत राहीले होते. उर्वरीत विदयार्थी रात्री 11 वाजता घरी गेले, सर्व मुलांना हा उपक्रम खूप आवडला.
मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन 22 फेब्रुवारी 2024 रोजी शाळेच्या मुनोत सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुण्या डॉ. प्रचिती सुरु कुलकर्णी (सिने, नाटय अभिनेत्री) या होत्या. याकार्यक्रमांवर आधारित पालकांसाठी प्रश्न मंजूषा घेण्यात आली. बरोबर उत्‍तरे असणाऱ्यांच्या उत्तराचा लकी ड्रॉ काढण्यात आला. श्रीमती कुडले व श्रीमती कांबळे अशा दोघींना बक्षिस मिळाले.
विदयार्थ्यांचे नेत्रदीपक यश
नृत्य व नाटय
बालकल्याण आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत (व्हिडिओ पाठवून व नंतर प्रत्यक्ष) कु तनिष आहेर याला व्दितीय क्रमांक मिळाला.
लायन्स क्लब आयोजित नृत्य स्पर्धेत दहा विद्यार्थी सहभागी झाले होते.
नवक्षितीज आयोजित नाटय स्पर्धेत पंधरा विद्यार्थी सहभागी झाले होते.
जीवनज्योत संस्था आयोजित नृत्य स्पर्धेत चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी शाळेला मिळाली.
निगडी शाळा आयोजित कविता व भक्तीगीत गायन स्पर्धेत कु. सर्वेश सुतार व पार्थ कारके या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
जीवनज्योत संस्था आयोजित खेळाच्या स्पर्धेत प्रथम व व्दितीय क्रमांकाची पाच बक्षिसे मुलांना मिळाली.
कामायनी प्रशिक्षण व संशोधन संस्था आयोजित 35 व्या मर्यादित षटक क्रिकेट स्पर्धा.  18 वर्षाखालील गटाच्या स्पर्धेत कामायनी गोखलेनगर शाळेच्या संघाला व्द‍ितीय क्रमांकाची ट्रॉफी व रोख रक्कम 3000/- रु. बक्षिस मिळाले.
संस्कार प्रतिष्ठान केंद्र पिरंगुट आयोजित जिल्हा स्तरीय ग्रामीण व शहरी क्रीडा स्पर्धेत शाळेला उपविजेता ट्रॉफी मिळाली.
समाजकल्याण आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कु महम्मद शेख व कु समृद्धी मलगे यांना व्दितीय क्रमांकाची बक्षिसे मिळाली.
स्पेशल ऑलिम्पिक आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश जाधव याला बॅडमिंटन स्पर्धेत 4 था क्रमांक मिळाला.
नवक्षितीज आयोजित जिल्हास्तरीय पर्वती चढणे स्पर्शेत कु समृध्दी मलगे, कु सिध्दी चौधरी, कु यश जाधव, कु. आराध्या रसाळ यांना प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची पदके मिळाली.
बालकल्याण आयोजित मुलींच्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कु श्रुती शेटे हिला सुवर्ण पदक व कु समृद्धी मलगे हिला रौप्यपदक मिळाले.
कामायनी संस्था आयोजित मुलांच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेंत कु श्रुती शेटे ब्रॉझपदक, कु समृध्दी मलगे उत्तेजनार्थ व पुनर्वसन गटात मुस्कान शेख व रिया गुरव यांचा सहभाग होता. रिया गुरवला रौप्यपदक मिळाले.
07 सप्टेंबर 2024 रोजी शाडू मातीपासून श्रींची मूर्ती बनविणे कार्यशाळा मुलांसाठी घेण्यात आली. यामध्ये 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. मा.   श्री. उमेश वाघ यांनी मार्गदर्शन केले.
जागतिक दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
बालकल्याण, संस्था आयोजित “व्हेरी स्पेशल आर्ट” या स्पर्धेसाठी दिल्लीला चित्र पाठविली यामध्ये 22 विद्यार्थी सहभागी झाले होते.
रोटरी क्लब आयोजित चित्रकला स्पर्धेत 25 विदयार्थी सहभागी झाले होते.
सकाळ चित्रकला स्पर्धा
विभागीय पातळीवर उत्तेजनार्थ – पराग समेळ 250 रु.
केंद्र पातळीवर प्रथम क्रमांक   – पराग समेळ   100 रु.
व्दितीय क्रमांक – प्रणव खिस्ते    75 रु.
तृतीय क्रमांक  – विराज कदम    50 रु.
अशी बक्षिसे मिळाली
या वर्षातील महत्वाचे प्रकल्प व देणगी
BNY मेलॉन तर्फे 06 स्मार्ट बोर्ड शाळेला देणगी दाखल मिळाले.
BNY मेलॉन व मार्श मॅकलेनन कंपनी तर्फे CSR Activity शाळेत राबविण्यात आली.
सामाजिक कर्तव्य निधीमधून शाळेच्या वरील मजल्याचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.
पिक्टोग्राम प्रकल्प – तज्ञांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पिक्टोग्रामचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शाळेतील 4 शिक्षक सहभागी आहेत. श्रीमती कटके, श्रीमती बुक्के, श्रीमती गेंगजे, श्रीमती कवडे.
दि. 05.12.2024 रोजी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, नऱ्हे आंबेगांव, पुणे यांचेतर्फे 109 विदयार्थ्यांचे जनरल तपासणी करुन ज्या विदयार्थ्यांना समस्या होत्या त्या विदयार्थ्यांना पालकांसोबत हॉस्पिटल पाठवून उपचार करण्यात आले.
दि. 17.02.2024 रोजी डॉ होमी भाभा आरोग्य दवाखाना, गोखलेनगर, पुणे यांचेतर्फे 125 विदयार्थ्यांचे आरोग्य तपासणी करुन त्यांना जंतनाशक गोळया देण्यात आले.
2.2 कामायनी उदयोग केंद्र, गोखलेनगर, पुणे 411016
    प्रमुख – श्री विजय मुकूंद टोपे
कार्यशाळेत १८ वर्षावरील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण गेली ४४ वर्षे दिले जात आहे. विद्यार्थ्यांची आवड, शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन त्यांना निरनिराळ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.
कार्यशाळेत कागद विच्छेदन यंत्र असून पुणे शहरातील विविध हॉस्पिटल, महाविद्यालये, कंपन्या इत्यादींकडून छेदनासाठी कागद मोफत दिला जातो. तो कागद विच्छेदित करून त्याचा पॅकिंगसाठी व पुनर्वापरासाठी विविध कंपनीत पाठविला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले काम मिळते. हातमाग व यंत्रमागावर कापड विणणे, शिवणकाम, पुस्तक बांधणी व विविध प्रकारचे जॉबवर्कची कामे केली जातात. यावर्षी रुबी हॉल हॉस्पिटलची रजिस्टर तयार करण्याचे नवीन ऑर्डर मिळाली आहे. यात मुलांचा सहभाग असतो.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे भव्य दिवाळी प्रदर्शन संस्थेच्या कामायनी सभागृहात आयोजित केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी निदेशकांच्या मदतीने तयार केलेल्या विविध वस्तू ठेवल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने आकर्षक व पर्यावरणपूरक आकाश कंदील, पणती, फुलदाणी इ. वस्तू तसेच सुवासिक उटणे, हातमाग व यंत्रमागावर तयार केलेले आकर्षक किचन नॅपकिन्स, टॉवेल्स, बेडशीटस्, पिशव्या, डस्टर्स, कापडी मोबाईल पाऊच, पर्सेस, हॅण्डबॅग, रांगोळी, रांगोळीचे रंग, आकर्षक ग्रिटींगकार्डस् इ. तयार केले जातात. तसेच रंगीत, पांढरी पाकिटे, हातकागदापासून तयार केलेल्या पिशव्या, रजिस्टर, पॅड, मेणबत्या व दिवाळी मेणपणत्या, तसेच हार, तोरण, तयार करून प्रदर्शनात मांडल्या जातात.  
विशेष उल्लेखनीय घटना
दि 15 जून कार्यशाळा सुरू, विद्यार्थ्यांचे स्वागत
दि 26 जून कार्यकारी विश्वस्त मा. श्रीमती श्रीलेखाताई कुलकर्णी यांचा वाढदिवस साजरा
दि 18 जुलै कामायनी संस्थेच्या संस्थापिका कै. सिंधुताई जोशी यांचा स्मृतीदिन साजरा
दि 02 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी, कै. अण्णाभाऊ साठे जयंती
दि 09 ऑगस्ट कामायनी निगडी येथे सुगम संगीत स्पर्धा
दि 15 ऑगस्ट भारत देशाचा 76 वा स्वातंत्र दिन साजरा.
दि 24 ऑगस्ट शिवण ब गटाची पालक सभा
दि 28 ऑगस्ट मा. श्री. सुपाते सर यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ. श्री. विजय टोपे सर यांचे स्वागत.
दि 06 सप्टेंबर पर्यावरण पूरक श्री गणेश मुर्ती बनविणे कार्यशाळा.
दि 28 सप्टेंबर श्री कसबा गणपती विसर्जन मिरवणूकीत मुलांचा बॅण्ड पथक सहभाग
दि 29 सप्टेंबर संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. अरविंद कुलकर्णी सर यांचा वाढदिवस
दि 02 ऑक्टोबर कै. सिंधूताई जोशी जन्मदिन, महात्मा गांधी जयंती.
दि 23 ऑक्टोबर खंडे नवमी यंत्रपूजा
दि 07 नोव्हेंबर दिवाळी प्रदर्शन, पालक मेळावा
दि 01 डिसेंबर दिव्यांग सप्ताह समारंभ
दि 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन. बालकल्याण येथे विदयार्थ्यांचा सहभाग.
दि 21 डिसेंबर संस्थेचा वर्धापन दिन साजरा
दि 03 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती.
दि 10 ते 12 जानेवारी क्रिकेट स्पर्धा या दोन गटात आयोजित करण्यात आल्या. 18 वर्षाखालील शाळा गट 8 संघ, 18 वर्षावरील कार्यशाळा गट 8 संघ कै. प. म. जोशी खटाव मिल्स मुंबई स्मृति करंडक व के. ए. लाहोरी स्मृति करंडक स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले होते.
दि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा.
दिनांक 28 जानेवारी ते 02 फेब्रुवारी या कालावधीत गायत्री संदेवाड, गणेश सुलाखे, प्रसन्ना हाडके स्पेशल ऑलिंम्पिक भारत स्पर्धेसाठी नागपूर येथे गेले होते.
दि 06 फेब्रुवारी समाज कल्याण आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग कार्यशाळेस सर्वसाधारण विजेते ट्रॉफी मिळाली.
दि 22 फेब्रुवारी वार्षिक स्नेहसंम्मेलन
दि 16 मार्च बी.एन. वाय. मेलॉन/स्वयंसेवकांचा विद्यार्थ्यां बरोबर सहभाग
2.3 कामायनी स्कूल फॉर मेंटली हॅडीकॅप्ड, निगडी, पुणे 411044
प्रमुख – श्रीमती शुभांगी सतिश शहा
बालमार्गदर्शन केंद्र.   
बालमार्गदर्शन केंद्रात 17 विदयार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मानसोपचार तज्ञ डॉ. प्रिया गायकवाड आणि मानद वैदयकीय अधिकारी डॉ. रणजितसिंह माने यांच्याकडून मुलांची नियमित तपासणी होत असते.
दिव्यांग मार्गदर्शन केंद्र.
दिव्यांग मार्गदर्शन केंद्रात पिंपरी चिंचवड परिसरातील 55 ते 60 पालकांना सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विदयार्थ्यांना पिंपरी चिंचवड म. न. पा. तर्फे दरवर्षी शिष्यवृत्‍ती देण्यात येत आहे.
विशेष उल्लेखनीय घटना
15 जून 2023 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. ज्यावेळी विदयार्थ्यांचे स्वागत औक्षण, बॅन्ड वाजवून करण्यात आले.
माहे मार्च 2023 ते एप्रिल 2024 मध्ये सर्व राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये माहिती देऊन आनंदाने साजरे करण्यात आले.
सर्व शिक्षकांचे दिशा अभ्यासक्रमाप्रमाणे कामकाज सुरु आहे.
21 जून 2023 रोज ‘आंतर राष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.
09 ते 10 ऑगस्ट 2023 रोजी आदरणीय कै. सिंधूताई जोशी यांच्या स्मरणार्थ ‘दिव्यांग मुलांच्या सुगम संगीत स्पर्धा’ आयोजित करण्यात आली. विविध गटात मिळून एकूण 53 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला.
26 ऑगस्ट 2023 रोजी ‘वर्षासहल’ आयोजित करण्यात आली. सहलीचा सर्वांनी आनंद लुटला.
गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी विविध स्पर्धां आयोजित करण्यात आल्या.
10 ऑक्टोबर 2023 ‘वर्ग सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली. याचे परीक्षण मा. श्रीमती सुलभा बारवकर यांनी केले.
दि.07.11.2023 रोजी शाळेत दिवाळी प्रदर्शन भरविण्यात आले. प्रसिध्द उद्योगपती    मा. श्री. पप्पु गुप्ता यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
30 नोव्हेंबर 2023 रोजी इनरव्हील क्लब तर्फे ‘दंत चिकित्सा शिबीर’ घेण्यात आले.
01 ते 08 डिसेंबर 2023 दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थीसाठी मनोरंजन, सहल व पालकांसाठी व्याख्याने आयोजित केली होती.
11 व 12 डिसेंबर 2023 रोजी लोकमान्य हॉस्पिटल, निगडी यांचेमार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
22 ‍डिसेंबर 2023 रोजी स्नेहमीलन यात्रेचे आयोजिन करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. श्री. संदीप वनवारी उपस्थ‍ित होते. दिव्यांग विद्यार्थ्यांबरोबर साधारण विद्यार्थी माहिती फलक घेऊन कामायनी स्कूल- काचघर चौक- भेळ चौक- संभाजी चौक– म्हाळसाकांत चौक- लोकमान्य हॉस्पिटल- सावली हॉटेल – कामायनी स्कूल मार्गावरुन प्रभात फेरी काढली. यात 7 शाळा सहभागी होत्या.
22 ते 24 जानेवारी 2024 रोजी’ जल्लोष शिक्षणाचा ‘कार्यक्रमात सहभाग.
13 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा ब्ल्यू स्कोप स्टील कंपनीचे 19 सदस्यांनी विद्यार्थ्यांकडून विविध कृती करुन घेतल्या. त्यात फनी गेम्समध्ये बोलिंग व रिंग टाकणे आणि होमसायन्समध्ये सॅन्डविच तयार करणे या कृतींचा समावेश होता.
28 फेब्रुवारी 2024 रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कै. रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडले. यावेळी शाळा, कार्यशाळा व तळेगाव केंद्राच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केला.  यावेळी श्री. श्रीनिवास दांगट, सहाय्यक आयुक्त, ‍दिव्यांग विभाग, पिंपरी चिंचवड, म. न. पा. व श्रीमती ईशा आगरवाल, प्रसिध्द अभिनेत्री उपस्थित होते. आदर्श पालक :- श्री. संजय चोबे(शाळा), श्री. शालीग्राम वाघ (कार्यशाळा).आदर्श विद्यार्थी :- चि. प्रज्वल चोबे (शाळा), चि. हेमंत वाघ (कार्यशाळा)
मा. प्राचार्या शहा मावशी शरीर साक्षरता या विषयी प्रात्यक्षिक व दृकश्राव्य पध्दतीने शिक्षण देत आहेत. त्याचा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.
विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
पिरंगुट येथे शालेयअंतर्गत जिल्हास्तरीय विविध खेळांच्या स्पर्धा विजेते पदाची ट्रॉफी निगडी शाळेस मिळाली.
नागपूर येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत कु. सुमेधा सोनवने प्रथम क्रमांक मिळाला.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी कु. सुमेधा सोनवने गेली होती. तिला ब्राँझ पदक मिळाले होते.
‍दिव्यांग शाळांच्या जिल्हास्तरीय विविध खेळांच्या स्पर्धा सणस क्रीडांगण, सारसबाग, पुणे येथे दि. 06.02.2024 रोजी झाल्या. त्यात निगडी शाळेस विजेते पदाची ट्रॉफी मिळाली.
शाहू  क्रीडांगण पिंपरी  चिंचवड महानगरपालिका व साई संस्कार यांचेतर्फे विविध खेळांच्या स्पर्धा विजेते पदाची ट्रॉफी मिळाली.  म्युझिक  सिस्टीम, मुलांना रोख स्वरुपात बक्षिसे मिळाली.
दिलासा यांनी घेतलेल्या नृत्य स्पर्धेत शाळेला उत्तेजनार्थ बक्षिस ‍मिळाले.
बालकल्याण संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वाद्य वादन स्पर्धेत ढोलकी वादन यात हर्षद कांबळे या ‍विद्यार्थ्यांस प्रथम क्रमांक मिळाला.
पिक्टोग्राम प्रकल्प- तज्ञांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पिक्टोग्रामचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. शाळेतील 4 शिक्षक सहभागी आहेत. श्रीमती फुलसुंदर, श्रीमती शेवते, श्रीमती बाविस्कर श्रीमती फापाळे
या वर्षातील महत्वाचे प्रकल्प व देणगी
बी. एन. वाय. मेलन यांच्याकडून सात स्मार्ट बोर्ड मिळाले.
मा. श्री. संदीप वनवारी यांचेकडून 51,000/- रुपये देणगी मिळाले.
मा.श्री. विजय कोलटकर यांचेकडून 20,001/- रुपये देणगी मिळाले.
S V TECH ENGG CONSULTANTS PVT LTD. यांचेकडून 11,000/- रुपये देणगी मिळाले.
मा. श्री. दिलीप गंगाधर जोशी यांचेकडून 10,000/- रुपये देणगी मिळाले.
Lions Club of Pune यांचेकडून 5,000/- रुपये देणगी मिळाले.
मा. श्रीमती कुसुम सुरेशचंद्र भगोदिया यांचेकडून 5,000/- रुपये देणगी मिळाले.
2.4 कामायनीचे सिंधुताई जोशी उदयोग केंद्र, तळेगांव दाभाडे, पुणे
प्रमुख – श्री. दिपक सोनवणे
मावळ परिसरातील गरज ओळखून प्रौढ मतिमंदां साठी कामायनी प्रशिक्षण संशोधन सोसायटी पुणे संचलित सिंधुताई जोशी उद्योग केंद्र जुना मुंबई – पुणे महामार्ग वर तळेगाव दाभाडे लिंब फाटा येथे दोन एकर जागेत दि ११ मे २०१६ रोजी सुरु करण्यात आलेले आहे, सदर केंद्रात तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, आंबी, वराळे, चाकण रोड, धामणे, सोमाटणे फाटा, देहूरोड, किवळे, चिंचोली, विकास नगर, माळवाडी, रावेत, थॉमस कॉलनी, साई नगर गहुंजे या परिसरातील एकूण पटावर ३० प्रशिक्षणार्थी असून पुरुष २४ व महिला ६, आहेत. प्रशिक्षणार्थींच्या पुनर्वसन व भविष्यच्या दृष्टीने कागदी पिशव्या, कृत्रिम फुले, आंबा, फळ झाडांना पाणी देणे, बाग स्वच्छ करणे, पेपर श्रेडिंग (कागदी कात्रणे), मातीच्या पणत्या रंगवणे, मण्याच्या माळा, रंगसंगतीच्या बाटल्या बनवणे, इ. कामे प्रशिक्षणार्थी करतात.
विशेष उल्लेखनीय घटना
गुढीपाडवा मंगळवार दिनांक 21.03. 2023 रोजी गुढीपाडव्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
हाफ पीच क्रिकेट स्पर्धा:- शनिवार दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी,  स्पर्धेत मध्ये मवाळ , पिंपरी चिंचवड, येथील ब्रह्मदत्त शाळा, कामायनी शाळा, कामायनी कार्यशाळा, कामायनी उद्योग केंद्र, तळेगाव इत्यादी शाळा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता, हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन मा. श्री. आशुतोष इ. प्र. भुपटकर, तसेच GKN कंपनी चाकण श्रीमती चैत्राली पाटेकर   श्री अभिषेक नारकर तसेच कंपनीचे सहकारी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभा नंतर सर्व स्पर्धकांची मैदानावर प्रभात फेरी करण्यात आली. स्पर्धेमध्ये दुपारचे भोजन सुशीला मंगल कार्यालयाचे संचालक श्री संतोष परदेशी यांच्याकडून देण्यात आले. पंच म्हणून क्रीडा शिक्षक      श्री अशोक नांगरे श्री रवींद्र जोशी व श्री प्रशांत गडदे यांनी कार्यभार सांभाळला. बक्षीस वितरण समारंभ रोटरी क्लब ऑफ मावळ, रोटरी क्लब ऑफ सिटी तळेगाव दाभाडे, यांचे अधिकारी मा. श्री.  दीपक चव्हाण, मा. श्री. मनोज ढमाले, मा. श्री. दादासाहेब उऱ्हे, उपस्थितीत विजेत्या संघाल बक्षीस देण्यात आले.
वर्धापन दिन:- मंगळवार, दिनांक २ मे २०२२ रोजी वर्धापन दिन, सर्व प्रशिक्षणार्थीच्या उपस्थितीत खाऊ वाटप करून संपन्न झाला.
आंतरराष्ट्रीय योग दिन:- बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन   करण्यात आले होते. या योगा दिनानिमित्त तळेगाव येथील ओरॅकल फिटनेस जिम येथील प्रशिक्षक राहुल शिंदे हे उपस्थित होते.
आषाढी कार्तिकी दिंडी सोहळा:- २७ जून २०२३ रोजी उद्योग केंद्रामध्ये आषाढी कार्तिकी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सौ शुभदा नाखरे तसेच स्नेहल वारसवडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी व प्रमुख पाहुणे व शिक्षक इतर कर्मचारी सर्वांनी संस्थेच्या आवारात पायी दिंडी काढण्यात आली व पसायदानाने कार्यक्रमाचे सांगाता झाली.
गुरुपौर्णिमा:- ३ जुलै २०२३ रोजी उद्योग केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संतोष खारे गुरुजी हे मान्यवर उपस्थित होते. त्यांचे स्वागत संस्थेचे लेखापाल प्रसाद करमरकर यांनी केले. प्रशिक्षणार्थींमधील शिवराज गराडे यांने गुरुजींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर संस्थेच्या सहाय्यक शिक्षिका स्नेहल दिघे यांनी मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
सुगम संगीत स्पर्धा:- 3 ऑगस्ट 2023 रोजी सुगम संगीत स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता ही स्पर्धा कामायनी विद्या मंदिर निगडी शाखेत आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये संस्थेतील शिवराज गराडे आणि संस्कृती शर्मा ह्यांनी सहभाग घेतला होता.
स्वातंत्र्य दिन:- १५ ऑगस्ट २०२३ रोजी, स्वातंत्र्य दिना निमित्त विघ्नहर्ता हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. मा. श्रीमती राणी बच्चे, डी, व्हा. पाटील कॉलेज प्रोफेसर. मा. श्री. पाटील संस्थेचे चेअरमन मा. श्री. आशुतोष इ. प्र. भुपटकर, यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थींना खाऊ वाटप करून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव:- 31 ऑगस्ट 2023 रोजी उद्योग केंद्रामध्ये चित्तोर  यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांचे अध्यक्ष, सदस्य यांची उपस्थिती होती.चित्तोर सरांच्या जन्मदिवसानिमित्त रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांनी पोडियम स्टँड( Podium Stand) संस्थेस देणगी केला.
गोकुळाष्टमी:- ७ सप्टेंबर २०२३ रोजी उद्योग केंद्रामध्ये गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सर्व प्रशिक्षणार्थींनी दहीहंडी फोडली व विविध नृत्य सादर केले.
दीपावली खाऊ वाटप:- ९ नोव्हेंबर २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ ट्रस्ट तळेगाव दाभाडे यांच्या सदस्य उपस्थित राहून त्यांनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सर्व प्रशिक्षणार्थींना खाऊ वाटप करण्यात आला. ट्रस्ट मधील श्रीमती सोनवणे ताई या उपस्थित होत्या.
राष्ट्पिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती, संस्थपिका, श्रीमती. सिंधुताई जोशी जयंती:- ३ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, तसेच कामायनी च्या संस्थपिका, श्रीमती. सिंधुताई जोशी जयंती, निमित्त प्रशिक्षणार्थीना फळ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला. 
रास दांडिया:- २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी उद्योग केंद्र मध्ये भोंडला आणि रास दांडिया कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय तपासणी:- ३० नोव्हेंबर २०२३ रोजी इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, यांच्यामार्फत सर्व प्रशिक्षणार्थींची आरोग्य तपासणी करण्यात आली, या तपासणीसाठी इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या अध्यक्ष संध्या थोरात त्याचप्रमाणे सेक्रेटरी निशा पवार इत्यादी, उपस्थित होते, वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टर दिपाली जवर व डॉक्टर राणी बच्चे उपस्थित होते वैद्यकीय तपासणी साठी १७ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
गायन कार्यक्रम:- 02 डिसेंबर 2023 रोजी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे सिंधुताई जोशी उद्योग केंद्र तळेगाव दाभाडे येथे मनोरंजनाच्या दृष्टीने प्रशिक्षणार्थींसाठी गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी क्लबचे प्रेसिडेंट श्रीमती संध्या थोरात सेक्रेटरी श्रीमती निशा पवार श्रीमती कृपा नागपाल श्रीमती पल्लवी तापस व श्री समीर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. श्री समीर महाजन यांनी गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन हे दिव्यांग सप्ताह असल्याकारणाने प्रशिक्षणार्थींच्या मनोरंजनाच्या हेतूने ठेवला होता.
विनो ग्लोबल वुमन वेल्फेअर ऑर्ग ट्रस्ट – १३ डिसेंबर २०२३ रोजी विना ग्लोबल वुमन वॉल्फेरे ऑर्ग ट्रस्ट तळेगांव दाभाडे या क्लबच्या महिला उपस्थित होत्या या क्लब तर्फे सर्व प्रशिक्षणार्थींना दुपारचे स्नेहभोजन  देण्यात आले,  तसेच विना ग्लोबल वुमन वॉल्फेरे ऑर्ग अध्यक्ष श्रीमती सपना शहा यांनी त्यांच्या संस्थेविषयी माहिती सांगितली त्याचप्रमाणे शितल शहा, हेमा शहा, मोहिनी राठोड, वर्षा उस्वाल आणि मीना पाठवा यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आपल्या प्रशिक्षणार्थींसाठी वैद्यकीय मेडिकल किट संस्थेला भेट दिली.
सहल श्री क्षेत्र भंडारा डोंगर:- 20 डिसेंबर 2023 रोजी सर्व प्रशिक्षणार्थीं साठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते या सहलीसाठी सर्व प्रशिक्षणार्थींना श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे घेऊन जाण्यात आले होते.  त्यानंतर मूर्तीचे दर्शन घेऊन सर्व प्रशिक्षणार्थींना दुपारचे जेवणाची व्यवस्था श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट यांनी केली होती.
स्नेह यात्रा:- २२ डिसेंबर २०२३ रोजी कामायनी शाखेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त कामायनी विद्यामंदिर निगडी येथे स्नेह यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव उद्योग केंद्रातून २० प्रशिक्षणार्थींनी स्नेह यात्रेमध्ये सहभाग घेतला होता.
शैक्षणिक सहल:- 30 जानेवारी रोजी ही शैक्षणिक सहल “आरडी ऑरगॅनिक अग्री टुरिझम “येथे नेण्यात आली होती, 25 प्रशिक्षणार्थी या सहली मध्ये सहभागी झाले होते. तेथे सर्व प्रशिक्षणार्थींनी ग्रीन हाऊस या विषयी माहिती मिळवली व तेथील उपकरणांची माहिती तेथील माननीय श्री संजय लकाडे यांनी प्रशिक्षणार्थींना दिली. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी तेथील फळबागांची पाहणी केली, सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी दुपारचे जेवण करून संस्थेत सुमारे साडेतीन वाजता पोहोचले.
संशोधन विभाग गोखलेनगर (संशोधक: डॉ. आशा देशपांडे)
गेली दोन वर्षे फ्रान्स मधील पिक्टो च्या सहकार्याने आपण चित्र मालिकेच्या सहाययाने आपले विदयार्थी अधिक स्वायत्तपणे काम करु शकतात का या प्रकल्पावर संशोधनकार्य करीत आहोत. यात गोखलेनगर आणि निगडी येथील 11 शिक्षक व निदेशक यांनी भाग घेतला होता. त्यात प्रथम त्यांनी विदयार्थी व त्यांना शिकवायची कामे यांची निवड केली, कामांची उदाहरणे म्हणजे कपडयांची घेडी घालणे, वेणी घालणे, काकडीची कोशिंबीर करणे यासारखी कामे घेतली. त्यानंतर प्रत्येक कामाची चित्रमालिका तयार करण्यात आली. पहिली मालिका विदयार्थ्यांना सोपीन गेल्याने त्यात सुधारणा करण्यात आली. नंतर मुलांना या कामाची कितपत माहिती मुळात आहे याची चाचणी घेऊन निरीक्षणे नोंदविण्यात आली. त्यानंतर प्रायोगिक गटातील मुलांना चित्रमालिकेव्दारे काम शिकविण्‍यात आले. तर नियंत्रित गटातील मुलांना तोंडी सूचना देऊन चित्राशिवाय तेच काम शिकविण्यात आले. दोन्ही गटातील मुले किती प्रमाणात काम शिकली आहेत आणि प्रायोगिक गटातील मुले किती प्रमाणात चित्रे ओळखतात याबददल निरीक्षणे करण्यात आली. सुरवातीचे मुलांचे ज्ञान आणि शिकविल्यानंतर ज्ञान आणि कौशल्य यात काही वाढ होते का आणि चित्रमालिकेच्या योगाने मुले अधिक स्वायत्त होऊ शकतात का हे तपासण्याचा हा प्रकल्प आहे.
या प्रकल्पात सर्वश्रीम कटके, बुक्के, कवडे, गेंगजे, नांगरे, सोनावले, फुलसुंदर, बाविस्कर, फापाळे, शेवते व श्री कृष्णा काळे यांनी भाग घेतला आहे. चित्रे काढण्यात श्री प्रवीण फडणीस आणि श्री दिलीप वंजारी यांनी मोलाचे साहाये केले आहे.
आगामी वर्षात आधी झालेल्या संशोधनावर आधारित मराठी पुस्तिका करणे तसेच कृतिसत्रे घेऊन ते संशोधन पालकांपर्यंत पोचवावे असा प्रयत्न राहणार आहे.
प. म. जोशी ग्रंथालय डिजिटल लायब्ररी, गोखलेनगर
ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह 5000 च्या वर असून ते सर्व नागरिकांसाठी नाममात्र शुल्कावर उपलब्ध आहे.
ग्रंथालयाची सभासद संख्या 250 पेक्षा अधिक आहे. परंतु नव्या तंत्रज्ञानामुळे पुस्तके आंतरजालावर उपलब्ध असल्याने ग्रंथालयाचा वापर कमी होत आहे.
प्रदीप मोघे
कोषाध्यक्ष
सुहास नगरे
कार्यवाह
श्रीलेखा कुलकर्णी उपाध्यक्षआशुतोष भुपटकर
अध्यक्ष
सांख्यिकी
विदयार्थी संख्या
केंद्रवर्षारंभनवीन प्रवेशसोडून गेलेवर्ष अखेर
शाळा, गोखलेनगर1252424125
कार्यशाळा, गोखलेनगर1041315102
प्रौढगट, गोखलेनगर26000125
शाळा, निगडी1001515100
शाळा, निगडी (पटाव्यतिरिक्त)24020719
कार्यशाळा, निगडी61030361
कार्यशाळा, तळेगांव33041225
कर्मचारी संख्या (मंजूर) नियुक्त
  व्यवस्थापन व शैक्षणिककार्यालयीनसेवक वर्ग
शाळा, गोखलेनगर(21) 16(04) 02(16) 08
कार्यशाळा, गोखलेनगर(07) 05(02) 02(05) 04
शाळा, निगडी(14) 04(02) 00(02) 02
शाळा, गोखलेनगर मानद000204
कार्यशाळा, गोखलेनगर मानद030001
शाळा, निगडी मानद040000
कार्यशाळा, निगडी मानद020102
कार्यशाळा, तळेगांव मानद020104
देणग्या नेहमीप्रमाणे यंदाही देणगीदारांचा उदार आश्रय संस्थेला लाभला. त्यापैकी काही देण्याग्यांचा उल्लेख येथे आवश्यक आहे.
देणगीदाराचे नांवरक्कम रुपये
बजाज फायनान्स लि.3,59,90,000/-
मार्श मॅकलेनन ग्लोबल सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि.31,00,000/-
मॅचिंग ग्रॅन्ड फ्रॉम बी एन वाय मेलॉन18,00,000/-
अस्मिती मेडिकल फौंडेशन ऍ़ड रिसर्च सेंटर10,00,000/-
श्री अभिजीत अरविंद कुलकर्णी10,00,000/-
आरआयजे इंजिनीअरींग प्रा. लि.10,00,000/-
ज्ञानक ऍ़टोमोटिव्ह स्टँपिंग प्रा. लि.9,85,260/-
टाटा ब्लू स्कोप स्टिल प्रा. लि.4,00,000/-
हिरा सॉप्‍टवेअर प्रा. लि.2,75,000/-
अर्जुन वाडकर फौंडेशन2,50,000/-
रमनानी अय्यंगार चॅरिटेबल ट्रस्ट1,00,000/-
श्री अजित लेले1,00,000/-
श्री अमित तेली1,00,000/-
श्रीमती विनीता काने1,00,000/-
वस्तूरुप देणगी  —  कॅनरा बँक कडून दोन कपाटे
आभार
खालील वैदयकीय तज्ञांनी संस्थेच्या विदयार्थ्यांना वैदयकीय सेवा मानद रुपात दिली त्याबददल त्यांचे संस्थेतर्फे मन:पूर्वक आभार
गोखलेनगर विभाग
डॉ. जयदीप पाटील,मानसोपचार तज्ञ
निगडी विभाग
डॉ. प्रिया गायकवाड,मानसोपचार तज्ञ
डॉ. रणजितसिंह माने,मानद वैदयकीय अधिकारी
पालक प्रतिनिधींनी स्थानिक व्यवस्थापन समित्यांवर प्रतिनिधित्व केले.
गोखलेनगर विभाग
शाळाश्रीमती सुलभा गायकवाड
कार्यशाळाश्रीमती माधवी पवार
निगडी विभाग
शाळाश्रीमती मंगल गारोळे
कार्यशाळाश्री प्रसाद कापसे
व्यवस्थापन
विश्वस्त मंडळ:-
श्रीलेखा कुलकर्णी
कार्यकारी विश्वस्त
डॉ. अरविंद कुलकर्णी
विश्वस्त
डॉ. आशुतोष भुपटकर
विश्वस्त
संस्था अध्यक्ष     डॉ. अरविंद कुलकर्णी

कार्यकारिणी       (01 एप्रिल 2023- 31 मार्च 2025)

अध्यक्ष           डॉ. आशुतोष भुपटकर
उपाध्यक्ष          श्रीलेखा कुलकर्णी
कार्यवाह           अॅड सुहास नगरे
खजिनदार          प्रदीप मोघे
सहकार्यवाह         अशोक कुलकर्णी
सदस्य             उत्तरा पंडित
सदस्य             सुप्रभा सावंत (दि. 05.11.2023 पर्यंत)
सदस्य             डॉ. जान्हवी थत्ते
सदस्य             डॉ. आशा देशपांडे
सदस्य             जावेद इनामदार
सदस्य             अॅड. दीपा खरे
सदस्य             कलिका मुजुमदार