कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी पुणे
स्थापना: २१ डिसेंबर १९६४
५५ वा वार्षिक अहवाल: २०१९-२०
२७०/बी गोखलेनगर, पुणे ४११०१६
दूरध्वनी: ०२० – २५६५१५८८, ०२० – २५६७३५२९
संकेतस्थळ: www.kamayani.org
ईमेल: kamayani.society@gmail.com
अनुक्रमणिका
वार्षिक सभेची सूचना
संस्थेचे वार्षिक वृत्त
सांख्यिकी
व्यवस्थापन
लेखापत्रके:
आयव्यय व ताळेबंद
लेखा परीक्षण अहवाल
कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटी
२७०/बी गोखलेनगर, पुणे ४११०२१
दिनांक – १ डिसेंबर २०२०
वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
महोदय /महोदया
कामायनी प्रशिक्षण व संशोधन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. डिसेंबर २०२० रोजी वाजता “कामायनी” गोखलेनगर, पुणे येथे होणार असून कामकाजाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.
१. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे
२. सन २०१९-२० चा अहवाल मंजूर करणे
३. सन २०१९-२० चा आयव्यय व ताळेबंद मंजूर करणे
४. सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक मंजूर करणे
५. मा अध्यक्षांच्या अनुमतीने येणारे आयत्या वेळचे विषय
तरी आपण सभेस उपस्थित राहण्याचे करून संस्थेवरील स्नेह कायम ठेवावा ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
अड. सुहास वसंत नगरे
कार्यवाह
संस्थेचे वार्षिक वृत्त
१. उपक्रम
संस्थेच्या तीन केंद्रात खालीलप्रमाणे उपक्रम सुरु होते.
- गोखलेनगर, पुणे ४११०१६
- कामायनी विद्या मंदिर, शाळा
- कामायनी उद्योग केंद्र, कार्यशाळा
- बालबोधिनी, प्रारंभिक आंतरक्षेपण केंद्र
- संशोधन विभाग
- प म जोशी ग्रंथालय
- सांस्कृतिक सभागृह
- निगडी, पिंपरी चिंचवड ४११०४४
- कामायनी विद्या मंदिर, शाळा
- कामायनी उद्योग केंद्र, कार्यशाळा
- बाल मार्गदर्शन केंद्र
- हरितगृह
- सांस्कृतिक सभागृह
- तळेगाव दाभाडे, ता मावळ, जि पुणे
- सिंधुताई जोशी उद्योग केंद्र
वार्षिक वृत्त
२. घटक संस्था
- गोखलेनगर: शाळा (प्रमुख: श्रीमती सुजाता आंबे) व कार्यशाळा (प्रमुख: श्री कालिदास सुपाते)
1 | दरवर्षीप्रमाणे सर्व सण, राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी विद्यार्थ्यांना माहिती देऊन साजरे करण्यात आले. |
2 | २० जुलै २०१९ रोजी पं केशव गिंडे यांच्या बासरी वादनाचा कार्यक्रम ‘अनाम प्रेम’ या संस्थेतर्फे मुनोत हॉल मध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी सादर करण्यात आला. |
3 | २१ सप्टेंबर २०१९ रोजी बी एन वाय मेलन कंपनीच्या ८१ स्वयंसेवकांनी आपल्या विद्यार्थ्यांसमवेत मौजेचे खेळ घेतले. त्यांच्या “सामाजिक जबाबदारी’ उपक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला. |
4 | १८ऑक्टोबर २०१९ रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे दिवाळी प्रदर्शन व आनंद मेळावा यांचे आयोजन करण्यात आले होते. |
5 | अपंग सप्ताहात श्री बालाजी मंदिर, केतकावळे येथे ४ डिसेंबर २०१९ रोजी विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली होती. एकूण ९४ विद्यार्थी व २५ कर्मचाऱ्यांनी सहलीचा आनंद घेतला. |
6 | ६ डिसेंबर २०१९ ला मैदानावर बालजत्रा भरवण्यात आली होती. त्यामध्ये वेगवेगळे खेळ व घोडागाडी, मिकी माउस असे करमणुकीचे प्रकार होते. सर्व मुलांनी उत्साहाने त्यात भाग घेतला. संगीत शिक्षिका श्रीमती अदिती सावंत यांनी हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. |
7 | नृत्य, गायन, चित्रकला आणि क्रीडा स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी भाग घेऊन पारितोषिकेही मिळवीत असतात. यंदाही उल्लेखनीय यशाची मालिका कायम राहिली. त्यातील काही खालीलप्रमाणे: |
बालकल्याण डूडल काढणे – प्रथम क्रमांक | |
जीवनज्योत नृत्य – लहान गट प्रथम क्रमांक | |
लायन्स गायन – दुसरा क्रमांक | |
लायन्स नृत्य – दुसरा क्रमांक | |
बालकल्याण कोडे सोडविणे – दुसरा क्रमांक |
8 | विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी खालीलप्रमाणे करण्यात आली. |
२ ऑगस्ट २०१९: भारती विद्यापीठ वाचा व श्रवणविज्ञान विभागातर्फे ११२ विद्यार्थ्यांची वाचा क्षमता तपासणी करण्यात आली. त्यातील २३ विद्यार्थ्यांना आठवड्यातून २ दिवस भारती विद्यापीठात वाचा उपचार दिले जातात. | |
२० सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हा रुग्णालय औंध यांच्यातर्फे ११२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. | |
१२ ऑक्टोबर २०१९ रोजी कम्युनिटी आय केअर प्रतिष्ठान तर्फे ५२ विद्यार्थ्यांचे डोळे तपासण्यात आले आणि १९ विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले. | |
9 | खालील शिक्षकांनी विशेष प्रशिक्षण वर्गांचा लाभ घेतला: |
नैसर्गिक व कृत्रिम पुष्परचना: श्रीमती शुभांगी शहा व श्री आबा भालेराव | |
जय वकील शाळा प्रस्तुत आणि शासन पुरस्कृत बुद्धिबाधित दिव्यांगांसाठी नवीन अभ्यासक्रम तयार करणे: श्रीमती सुजाता आंबे व श्रीमती शुभांगी शहा | |
10 | यंदा ३३ व्या वर्षी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २१-२३ जानेवारी २०२० दरम्यान करण्यात आले आणि १८ वर्षाखालील व त्यावरील अशा दोन गटांत स्पर्धा घेण्यात आली. लहान गटात ४ संघात ६० विद्यार्थी व मोठ्या गटात ९ संघातल्या १३५ विद्यार्थी खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद घेतला. |
- निगडी: शाळा (प्रमुख: श्रीमती सुनंदा जोशी) व
कार्यशाळा (मानद प्रमुख: श्री भाऊसाहेब कांबळे)
1 | दरवर्षीप्रमाणे सर्व सण, राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी विद्यार्थ्यांना माहिती देऊन साजरे करण्यात आले. |
2 | बाल मार्गदर्शन केंद्रात १५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. अपंग मार्गदर्शन केंद्रात ५० ते ६० पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. |
3 | अपंग सप्ताहानिमित्त आंतरशालेय स्पर्धा कोलाज व फुले बनविणे या कलाप्रकारात घेण्यात आली. श्रीमती मेघा गर्ग यांनी मुलांसाठी खेळणी उपलब्ध करुन दिली. पालकांसाठी श्री.अशोक देशमुख यांचे तणाव व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान झाले. विश्व श्रीराम संस्थेतर्फे मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. |
4 | २२ ऑक्टोबर २०१९ रोजी ४२२शाळेत दिवाळी प्रदर्शन भरविण्यात आले.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री झाली.पालकांचा प्रतिसाद उत्तम मिळाला. |
5 | १७ जानेवारी २०२० रोजी १७रामकृष्ण मोरे सभागृह,चिंचवड येथे शाळा,कार्यशाळा व तळेगाव कार्यशाळेचे वार्षिक स्नेह संमेलन झाले. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिनेकलावंत श्री. राहुल सोलापूरकर उपस्थित होते. |
6 | ११ फेब्रुवारी २०२० रोजी तथापी संस्थेतर्फे पालकांसाठी श्री.अच्युत बोरगावकर यांचे वाढत्या वयाच्या मुलांच्या लैंगिक समस्या या विषयावर व्याख्यान झाले. |
7 | २८ फेब्रुवारी २०२० रोजी शाळा व कार्यशाळेची शैक्षणिक सहल खेडगाव वाखारी,दरेकर वाडा,पुणे येथे नेण्यात आली होती. सहलीचा उद्देश मुलांना ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष रूप पाहता यावे हा होता. |
8 | नवीन उपक्रम:-यंदा प्रथमच संस्थेने दि.03/03/2020 रोजी मुलींच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात १४ शाळा व २८ मुलींनी भाग घेतला होता. |
9 | निगडी शाळेतील पहिल्या मजल्यावर पूर्वी मंजूर केलेल्या आराखड्यानुसार सभागृहाचे बांधकाम सुरु करण्यात आले. हे सभागृह तयार झाल्यावर पूर्वीच्या सभाकक्षाचे तीन वर्ग करण्यात येतील व त्यायोगे शाळेच्या प्रतीक्षा यादीवर असलेल्या ४०अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. |
- तळेगाव कार्यशाळा (प्रमुख: श्री दिलीप भोसले)
1 | १2 मे २०१९ रोजी केंद्राचा तिसरा वर्धापनदिन श्रीमती रोहिणी मोरे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पुणे जिल्हा परिषद व श्री निशिकांत डांगे, के के नाग लिमिटेड, उर्से यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न झाला. |
2 | 20 जून २०१९रोजी जागतिक योगदिन साजरा करण्यात आला, श्रीमती ज्योती प्रकाश मुंगी व अरुण मा.पालकृत यांनी योगासनाचे शरीर बलवान व मन प्रसन्न ठेवण्यासाठीचे महत्व विषद केले, सदर प्रसंगी आपल्या प्रशिक्षणार्थीनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. |
3 | 15 ऑगस्ट 2019 रोजी लायन श्री निलेश मेहता, माजी अध्यक्ष लायन्स क्लब तळेगाव दाभाडे, यांच्या शुभहस्ते, मा. डॉ. आशुतोष भूपटकर, यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला, सदर प्रसंगी मुलांनी देशभक्तीपर गीते गायली. |
4 | 22 ऑक्टोबर २०१९ दिवाळी निमित्त डॉ अभय पवार, प्राचार्य, इंजिनिअरिंग कॉलेज, डी. वाय. पाटील, आंबी, स्टाफ तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यानी आपल्या प्रशिक्षणार्थीना दिवाळी सप्रेमभेट दिली. |
5 | दिवाळी निमित्त मुलांनी तयार केलेल्या मातीच्या पणत्या, पायपुसणी, तुळशीची रोपे इ. ची विक्री रोटरी क्लब कोथरूड, 9 अंबर हॉल कर्वे रोड, इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे, नाना नानी पार्क, तळेगाव दाभाडे, तसेच कामायनी उद्योग केंद्र गोखले नगर येथे प्रदर्शनात विक्री करण्यात आली. |
6 | 9 नोव्हेबर रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, सहकार नगर, पुणे येथील अध्यक्ष श्री. आशुतोष कुलकर्णी, सचिव दीपक भडकमकर व त्यांच्या 34 ज्येष्ठ नागरिकांनी सदिच्छा भेट दिली. कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन क्रिकेट स्पर्धे साठी रु 10000/-रोख देणगी प्रदान केली. |
7 | समावेशक सिक्स – अ – साईड क्रिकेट स्पर्धा राष्टीय अपंग सप्ताह व जागतिक अपंग दिना निमित्त तळेगाव व पिंपरी चिंचवड परिसरातील विशेष व सामान्य मुलांच्या समावेशक हाफपीच प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या स्पर्धेत, 2 सर्वसाधारण मुले, 4 विशेष मुले आणि राखीव 2 मुले अशा 8 संघा मधून 64 मुलांनी सहभाग करण्यात आला होता. सदर स्पर्धेचा शुभारंभ, रोटरी क्लब तळेगाव सिटी अध्यक्ष, मनोज ढमाले, कार्यकारी विश्वस्त श्रीमती श्रीलेखाताई कुलकर्णी व पारितोषिक वितरण मा.श्री यशवंत भुजबळ, माजी चेअरमन, PDCA यांच्या शुभहस्ते सम्पन्न झाला, प्रथम क्रमांक कामायनी विद्या मंदिर निगडी, द्वितीय पारितोषिक कामायनी उद्योग केंद्र, निगडी, आणि त शिस्तबद्ध संघ पारितोषिक साईसंस्कार संस्था. संभाजी नगर, चिंचवड यांना देण्यात आला, |
8 | ‘तथापी ट्रस्ट’ पुणे च्या समन्वयिका श्रीमती सुषमा खराडे यांनी दि 19 डिसेंबर रोजी पालकांना “शरीर साक्षरता व लैंगिकता शिक्षण या विषयी मार्गदर्शन केले, 10 पालकांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला. |
9 | तथापी ट्रस्ट पुणे “आम्ही पण मोठे होतोय ” या मतिमंद मुलांसाठी शरीर साक्षरता व लैंगिकता शिक्षण चित्रसंचाद्वारे माहिती महिला प्रशिक्षणार्थीना श्रीमती सुषमा खराडे व पुरुष प्रशिक्षणार्थीना श्री अच्युत बोरगावकर यांनी मार्गदर्शन केले. |
- बाल बोधिनी प्रारंभिक कृतिक्षेपण केंद्र, गोखलेनगर (समन्वयक : डॉ आशा देशपांडे)
1 | ० ते ६ वर्षे वयाच्या बालकांची तज्ञांतर्फे तपासणी, कायिक व वाचिक उपचार तसेच पालकांसाठी समुपदेशन या सर्वांची सोय या केंद्रामध्ये करण्यात आली आहे. |
2 | आजमितीस एकूण ४३ बालके या केंद्राचा लाभ घेत आहेत. त्यांना नाममात्र शुल्क आकारले जाते. |
3 | जंगली महाराज रस्त्यावरील कामायनी टॉवर मधून हे केंद्र गोखलेनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. |
- संशोधन विभाग, गोखलेनगर (प्रमुख: डॉ आशा देशपांडे )
1 | यंदा “मासिक पाळीतील मुलींचे आरोग्य – समस्या व व्यवस्थापन” या विषयावर सर्वेक्षणाच्या कामास सुरवात झाली. पुणे परिसरातील संस्थांच्या साह्याने पालकांना व शिक्षकांना भेटून माहिती गोळा करण्याचे काम हे पालकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. या प्रकल्पाला विमलाबाई जटार ट्रस्ट तर्फे आर्थिक साहाय्य मिळाले आहे. |
2 | संस्थेला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्यामार्फत संशोधन संस्था म्हणून २०२०-२१ या वर्षासाठी मान्यता मिळाली आहे. |
- प म जोशी ग्रंथालय, गोखलेनगर (व्यवस्था: श्री चंद्रकांत कटकम )
1 | ग्रंथालयातील ग्रंथ संग्रह ५००० च्या वर असून ते सर्व नागरिकांसाठी नाममात्र शुल्कावर उपलब्ध आहे. |
2 | ग्रंथालयाची सभासद संख्या २५० पेक्षा अधिक आहे परंतु नव्या तंत्रज्ञानामुळे पुस्तक आंतरजालावर उपलब्ध असल्याने ग्रंथालयाचा वापर कमी होत आहे. |
- हरितगृह, निगडी
1 | हे हरितगृह २०१८ मध्ये निगडी शाळेतील सिंधुताई जोशी हॉल च्या पूर्व बाजूस उभारले असून त्याचे क्षेत्र सुमारे २४०० चौरस फूट आहे. त्याच्या उभारणीचे सर्व काम व खर्च लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड तर्फे करण्यात आला आहे. |
2 | या हरितगृहात निरनिराळ्या ऋतू प्रमाणे भाज्यांची लागवड केली जाते व लावणी, फवारणी, तोडणी इ सर्व कामाचा अनुभव शाळा व कार्यशाळा यामधील मुलामुलींना मिळत असतो. आतापर्यंत भेंडी, मिरची, सिमला मिरची इ भाज्या लावण्यात आल्या आहेत. |
विशेष उल्लेख
यावर्षी प्रथमच साधारण विद्यार्थी व तरुण यांना आपल्या विशेष विद्यार्थ्यांबरोबर सहभाग घेण्याची संधी २१ डिसेंबर २०१९ च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून एक समावेशक प्रभात फेरी गोखलेनगर ते पी वाय सी मैदान अशी काढण्यात आली. विविध संस्थांमधील विशेष मुले व मुली यांनी साधारण विद्यार्थी आणि तरुण यांच्याबरोबर चालत ही फेरी पूर्ण केली. ५००हून अधिक जणांनी या फेरीत भाग घेतला. गुरुकुल, अशोकनगर, सिम्बियोसिस मानसशास्त्र विभाग तसेच बी एन वाय मेलन कंपनीतील कर्मचारी यांनी या उपक्रमात भाग घेऊन विशेष मुलांच्या समाजातील समावेशाचे सक्रिय उदाहरण या निमित्ताने घालून दिले.
प्रदीप मोघे कोषाध्यक्ष | सुहास नगरे कार्यवाह | श्रीलेखा कुलकर्णी उपाध्यक्ष | आशुतोष भुपटकर अध्यक्ष |
सांख्यिकी
विद्यार्थी संख्या
केंद्र | वर्षारंभ | नवीन प्रवेश | सोडून गेले | वर्षअखेर |
शाळा, गोखलेनगर | 125 | 19 | 19 | 125 |
कार्यशाळा, गोखलेनगर | 103 | — | 03 | 100 |
प्रौढ गट, गोखलेनगर | 42 | — | 03 | 39 |
शाळा, निगडी | 100 | 11 | 11 | 100 |
कार्यशाळा, निगडी | 49 | 11 | — | 60 |
कार्यशाळा, तळेगाव | 25 | 7 | 1 | 31 |
कर्मचारी संख्या [मंजूर] नियुक्त
केंद्र | व्यवस्थापन व शैक्षणिक | कार्यालयीन | सेवक वर्ग |
शाळा, गोखलेनगर | [18] 16 | [2] 2 | [11] 11 |
कार्यशाळा, गोखलेनगर | [7] 6 | [2] 2 | [5] 4 |
शाळा, निगडी | [16] 14 | [2] 2 | [6] 6 |
कार्यशाळा, निगडी सर्व मानद | 4 | 5 | 1 |
कार्यशाळा, तळेगाव सर्व मानद | 2 | 1 | 1 |
आभार
१. खालील वैद्यकतज्ज्ञांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा मानद रूपात दिली त्याबद्दल त्यांचे संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार
गोखलेनगर
डॉ जयदीप पाटील | मानसोपचार तज्ज्ञ |
डॉ ऋता सावरकर | बालरोगतज्ज्ञ |
डॉ मनीषा गारे | कायिक उपचार तज्ज्ञ |
डॉ मधुरा कुलकर्णी | वाचिक उपचार तज्ज्ञ |
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय | वाचिक उपचार विभाग |
निगडी
डॉ प्रिया गायकवाड | मानसोपचार तज्ज्ञ |
डॉ रणजितसिंह माने | वैद्यक तज्ज्ञ |
२. खालील पालक प्रतिनिधींनी स्थानिक व्यवस्थापन समित्यांवर प्रतिनिधित्व केले.
गोखलेनगर
शाळा | श्रीमती सोनाली पाटील |
कार्यशाळा | श्रीमती नीलिमा शेळके |
निगडी
शाळा | श्री अरुणाचलम दास |
कार्यशाळा | श्रीमती वैशाली धादमे |
व्यवस्थापन
विश्वस्त मंडळ
श्रीलेखा कुलकर्णी कार्यकारी विश्वस्त | डॉ अरविंद कुलकर्णी विश्वस्त | डॉ आशुतोष भुपटकर विश्वस्त |
डॉ अरविंद कुलकर्णी संस्था अध्यक्ष |
कार्यकारिणी:
(१ एप्रिल २०१८ – ३१ मार्च २०२१)
अध्यक्ष | डॉ आशुतोष भुपटकर |
उपाध्यक्ष | श्रीलेखा कुलकर्णी |
कार्यवाह | ऍ़ड सुहास नगरे |
खजिनदार | प्रदीप मोघे |
सहकार्यवाह | अशोक कुलकर्णी |
सदस्य | उत्तरा पंडित |
सदस्य | सुप्रभा सावंत |
सदस्य | डॉ जान्हवी थत्ते |
सदस्य | मधुलिका भुपटकर |
सदस्य | डॉ आशा देशपांडे |
सदस्य | शरद पटवर्धन |
सदस्य | जावेद इनामदार |